Saturday, June 19, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी Live Update: गोव्यात ९ मे ते २५ मेपर्यंत कर्फ्यू लागू होणार

Live Update: गोव्यात ९ मे ते २५ मेपर्यंत कर्फ्यू लागू होणार

Related Story

- Advertisement -

मुंबई गेल्या २४ तासांत ३ हजार ३९ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ४ हजार ५२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ७१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सविस्तर वाचा 


- Advertisement -

गोव्यामध्ये ९ मे ते २३ मेपर्यंत कर्फ्यू लागू करण्यात येणार आहे. यादरम्यान सकाळी ७ ते दुपारे १ पर्यंत किराणा दुकाना सुरू राहणार असून सकाळी ७ ते संध्याकाळी ७ पर्यंत रेस्टॉरंटला ऑर्डर देण्यास परवानगी आहे.


- Advertisement -

दिल्ली गेल्या २४ तासांत १९ हजार ८३२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून ३४१ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर १९ हजार ८५ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे आता दिल्लीतील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२ लाख ९२ हजार ८६७वर पोहोचली असून यापैकी आतापर्यंत १८ हजार ७३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११ लाख ८३ हजार ९३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


कुख्यात डॉन छोटा राजन याचा कोविडने मृत्यू झाला आहे. तिहार तुरुंगात असताना त्याला कोरोनाची लागण झाली होती. दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारादरम्यान छोटा राजनचा मृत्यू झाला. सविस्तर वृत्त 


कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी देशातील परिस्थितीचा सर्वसमावेशक आढावा घेतला. यादरम्यान, त्यांनी देशातील राज्यांची आणि जिल्ह्याची कोरोना परिस्थिती जाणून घेतली. याव्यतिरिक्त पंतप्रधानांनी ज्या राज्यांतील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, त्या-त्या राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली. पंतप्रधानांनी तेलंगणा, आँध्रप्रदेश, ओडिशा आणि झारखंडच्या मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा केली.


पुण्यात कोरोना नियंत्रणासाठी निर्बंध आणखी कडक करण्याच्या अजितदादांच्या सूचना

पुण्यामध्ये कोरोनाची साखळी तोडण्यासाठी येत्या दिवसांमध्ये निर्बंध आणखी कडक करण्याच्या सूचना पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. पुण्याच्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये पार पडलेल्या आढावा बैठकीत त्यांनी या सूचना प्रशासनाला केल्या आहेत.


देशात गेल्या २४ तासात ४ लाख १४ हजार १८८ नव्या कोरोना बाधित रूग्णांची नोंद कऱण्यात आली आहे. याकाळात ३ हजार ९१५ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. दिलासादायक म्हणजे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावादरम्यान ३ लाख ३१ हजारांहून अधिकांनी केली कोरोनावर मात केली आहे. (सविस्तर वाचा)


भारतरत्न लता मंगेशकर यांनी बीकेसी हॉस्पिटलचे डीन डॉ.राजेश डेरे यांच्यासाठी पत्र लिहून केले कामाचे कौतुक.


मुंबई महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या सायन, नायर, केईएम आणि कुपर रुग्णालयातील निवासी डॉक्टर थकबाकी आणि पगारवाढीच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. पालिकेकडून त्यांना देण्यात येणारा १० हजार रुपये कोविड भत्ता हीच पगारवाढ असून ११ महिन्यांची थकबाकी नामंजूर करण्यात आली आहे. याबाबत निवासी डॉक्टरांनी नाराजी व्यक्त केली आहे. सात दिवसात थकबाकी न देण्याचा निर्णय मागे न घेतल्यास पालिका रुग्णालयातील तब्बल तीन हजार डॉक्टर सामूहिक रजेवर जातील असा इशारा पालिका मार्ड संघटनेने दिला आहे. डॉक्टरांच्या सेवेची दखल घेत पालिकेने प्रोत्साहन म्हणून पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांसह कोविडसाठी काम करणाऱ्या सर्व डॉक्टरांना दहा हजार रुपये भत्ता लागू केला. त्याच दरम्यान मे २०२० मध्ये सरकारी निवासी डॉक्टरांचा पगार अर्थात विद्यावेतन १ हजार रुपयांनी वाढवले तरी पालिका रुग्णालयातील ३००० डॉक्टरांना दहा हजार रुपयांची पगारवाढ मिळालेली नाही. ही थकबाकी लवकरात लवकर मिळावी अशी या डॉक्टरांची मागणी आहे. पालिकेने मात्र थकबाकी देण्यास नकार दिला आहे हीच पगारवाढ आहे. त्यामुळे थकबाकी नामंजूर करण्यात येत असल्याचे अधिकृत पत्र पालिकेच्या वतीने जारी करण्यात आले. त्यामुळे निवासी डॉक्टरांमध्ये नाराजी आहे


अमरावती महापालिका क्षेत्रात असणारा कोरोनाचा प्रादुर्भाव आता अमरावती ग्रामीण भागांमध्ये पसरत आहे. ग्रामीणमध्ये आतापर्यंत ३२ हजार ६०२ रुग्ण आणि ५३६ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालेला आहे. गुरुवारी जिल्ह्यात ११८९ कोरोनाग्रस्तांची नोंद झाली, यात महापालिका क्षेत्रातील ३०७ आणि ग्रामीणमधील ८८२ जणांचा समावेश आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीणमध्ये रुग्णांचे प्रमाण सध्या जास्त आहे.. त्यामुळे सर्वच तालुक्यांतील ‘हॉट स्पॉट’ असणारी १३० गावे सील करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.


आसाममधील मोरीगाव येथे आज सकाळी सव्वासहा वाजेदरम्यान २.८ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप झाला.


कोरोनामुळे भारतामध्ये अडकलेल्या नागरिकांना १५ मेपासून मायदेशी परत जाणारी उड्डाणे सुरू करण्यात यावी, असे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी शुक्रवारी सांगितले. ऑस्ट्रेलियातील अधिकाऱ्यांनी गेल्या आठवड्यात भारतातील कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाल्याने तेथील नागरिकांनाही घेऊन भारतातून प्रवेश करण्यास बंदी घातली होती. तर याप्रकरणी दोषींवर कारवाई केली जाऊ शकते आणि दंड होऊ शकेल असा इशाराही दिला होता.


देशाच्या संस्कृती, कला आणि साहित्यावर आपली छाप उमटवणाऱ्या आणि नोबेल पुरस्कार विजेत्या रविंद्रनाथ टागोरांचा आज १६० वा जन्मदिवस साजरा केला जात आहे. रविंद्रनाथ टागोरांना त्यांच्या गितांजली या महाकाव्यासाठी १९१३ सालचा नोबेल पुरस्कार मिळाला होता. ते आशियातील पहिलेच नोबेल पुरस्कार विजेते होते.  रविंद्रनाथ टागोरांचा जन्म ७ मे १८६१ साली कोलकात्यात एका संपन्न कुटुंबात झाला. रविंद्रनाथांनी बॅरिस्टर व्हावं अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यासाठी त्यांना १८७८ साली ब्रिटनला पाठवण्यात आलं. त्या ठिकाणी त्यांना पाश्चिमात्य संगीत आणि नृत्य तसेच अन्य कलांचा अविष्कार पहायला मिळाला. त्यानंतर ते भारतात परतले.


वडाळा बेस्ट डेपो मध्ये बस चालक आणि बस वाहक यांचे पगार न मिळाल्याने आंदोलन सुरू आहे. यावेळी एकही बस शुक्रवारी सकाळपासून डेपोमधून बाहेर काढली नाही. बस चालकांना अटक केली आहे पोलीस बंदोबस्त लागला असल्याची माहिती मिळतेय.

- Advertisement -