Wednesday, June 23, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर CORONA UPDATE Live Update: गोव्यात २४ तासांत ३,७५१ नव्या रुग्णांची वाढ, ५५ जणांचा मृत्यू

Live Update: गोव्यात २४ तासांत ३,७५१ नव्या रुग्णांची वाढ, ५५ जणांचा मृत्यू

Related Story

- Advertisement -

गोव्यात गेल्या २४ तासांत ३ हजार ७५१ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ५५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३ हजार २५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. गोव्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख १६ हजार २१३वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ हजार ६१२ जणांचा मृत्यू झाला असून ८२ हजार २१४ जण कोरोनामुक्त झाले आहेत.


- Advertisement -

गेल्या २४ तासांत मुंबईत २ हजार ६७८ नवे कोरोनाबाधित आढळले असून ६२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३ हजार ६०८ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सविस्तर वाचा 


- Advertisement -

गेल्या २३ तासांत देशात २२ लाख ९७ हजार २५७ कोरोना लसीचे डोस दिले असून आतापर्यंत १६ कोटी ७३ लाख ४६ हजार ५४४ कोरोना लसीकरण पार पडले आहे. माहिती व प्रसारण मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे.


मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूची नेमकी आकडेवारी लपवली जातेय, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. रुग्ण कमी झाल्याचे आभासी चित्र निर्माण झाल्याचे मत फडणवीसांनी व्यक्त केले आहे. याबाबतचे पत्र देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले आहे.


सिंधुदुर्ग सोलापूरसह राज्यात ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस, गारपीट होण्याची शक्यता

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील चार दिवस महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण अनेक जिल्ह्यात ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागनं वर्तविली आहे. त्याप्रमाणं सिंधुदुर्ग जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही पावसानं हजेरी लावलीय. हवामान विभागनं सिंधुदर्ग आणि सोलापूरसह विविध जिल्ह्यात आज ही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. सिंधुदुर्गमध्ये शुक्रवारी सायंकाळी वादळी वारे आणि विजांच्या लखलखाटासह जोरदार पाऊस कोसळला. हवामान विभागानं राज्यात पाऊस व काही ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा देखील दिला आहे.


राज्य सरकार नव्या मागासवर्गीय आयोगाची स्थापना करणार? सरकारी हालचालींना वेग

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्राचा मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केल्यानंतर आता सरकारी हालचालींना वेग आल्याचं समजतंय. सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड अहवाल फेटाळल्यामुळे नव्याने मागासवर्गीय आयोगाची स्थापना करणार असल्याची शक्यता आहे. हा आयोग नव्यामने अहवाल तयार करुन तो राष्ट्रपतींकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर मराठा समाजाला माध्यमातून आरक्षण दिलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे.


पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन; महाराष्ट्राच्या कोरोनाविरोधातील लढाईचं केलं कौतुक


देशात २४ तासांत पहिल्यांदाच 4 हजाराहून अधिक मृत्यू, तर रुग्णसंख्या 4 लाख पार

देशात कोरोना विषाणूचा दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. यात कोरोना रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढत होत आहे. गेल्या २४ तासांत देशात ४ हजाराहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे, तर  ४ लाख १ हजार ७८ नवे बाधित रुग्ण देशात आढळले आहेत.


आयएनएस विक्रमादित्य बोर्डातील विमानवाहू वाहनांना आग, या आगी सापडलेले सर्व कर्मचारी सुरक्षि असल्याची माहिती भारतीय नौदलाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे.


Corona Treatment : हॉस्पिटल उपचारांसाठी २ लाखाहून अधिक रोखीने व्यवहारासाठी केंद्राची सूट


- Advertisement -