घरताज्या घडामोडीLive Update: गोव्यात आज दिवसभरात ४३ नव्या रुग्णांची वाढ, ३ जणांचा मृत्यू

Live Update: गोव्यात आज दिवसभरात ४३ नव्या रुग्णांची वाढ, ३ जणांचा मृत्यू

Subscribe

गोव्यात आज दिवसभरात ४३ नव्या रुग्णांची वाढ झाली असून ३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ८४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या गोव्यात ७२९ रुग्ण सक्रीय आहेत.

- Advertisement -

क्रूझ ड्रग्सपार्टी प्रकरणात आता आर्यन खानसह आठ जणांचा एनसीबीची कोठडी सुनावण्यात आली आहे. आता एनसीबीला आर्यनसह इतर आरोपींना घेऊन एनसीबी कार्यालयात पोहोचली आहे.


आर्यन खानसह इतर दोन्ही आरोपींना ७ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीची कोठडी

- Advertisement -


क्रूझ ड्रग्स प्रकरणात आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचे एनसीबीने म्हटले आहे.


क्रूझ ड्रग्स पार्टी प्रकरणी सध्या किला कोर्टात सुनावणी सुरू आहे. आर्यन खान, मुनमुन आणि अरबाज या तिघांना कोर्टात दाखल करण्यात आले असून एनसीबीने तिघांच्या कोठडीची मागणी केली आहे. १३ ऑक्टोबरपर्यंत एनसीबीने कोठडी मागितली आहे. आर्यनाच्या मोबाईलमधून नवीन माहिती समोर आली आहे. मोबाईल चॅटवरून बरीच माहिती मिळाली आहे. ड्रग्स घेताना किडवर्डचा वापर केल्याचे समोर आले आहेत.


कार्डेलिया क्रूझवर एनसीबीने पुन्हा धाड टाकली. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्या नेतृत्वात पुन्हा ६ जणांना ताब्यात घेण्यात आले असून ड्रग्ज प्रकरणात आतापर्यंत एकूण १४ जणांना एमसीबीने ताब्यात घेतले आहे.


शेतकरी नेते आणि एडीजींमध्ये चर्चा झाली. त्यानंतर मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेण्यात आला असून गंभीर जखमींना १० लाख रुपये देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना ४५ लाख रुपयांसह सरकारी नोकरी देण्यात येणार आहेत.


माझे विद्यार्थी माझी जबाबदारी अंतर्गत मुख्यमंत्र्यांचा शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद सुरू आहे. आजपासून राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्यात. माझे विद्यार्थी माझी जबाबदारी या उपक्रमातंर्गत मुख्यमंत्री विद्यार्थी आणि शिक्षकांशी संवाद साधत आहेत.


क्रूझ पार्टीप्रकरणी आरोपींना एनसीबीच्या कार्यालयातून किल्ला कोर्टात हजर केले असून आरोपींना कस्टडी मिळणार की दिलासा मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.


आमदार रवी राणा लोअर परेलच्या सिटी.को.ऑप बँकेत दाखल झाले असून बँकेतील कर्मचाऱ्यांशी रवी राणा संवाद साधणार आहेत. सिटी को.ऑप बँकेत अडसूळांनी घोटाळा केल्याचा आरोप त्यांनी केला होता.


कार्डेलिया क्रूझवर NCBची पुन्हा छापेमारी करण्यात आली आहे. शनिवारी याच क्रूझवर ड्रग्ज पार्टीवर NCB ची छापेमारी केली होती ज्यात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला NCB ने अटक केली. आज पुन्हा एकदा एनसीबीचे झोनल अधिकारी समीर वानखेडे  आपल्या पथकासह क्रूझवर दाखल झाले आहेत.


मुंबईच्या काळबादेवी परिसरात ४ मजली इमारत कोसळून एका ६१ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. (सविस्तर वृत्त थोड्याच वेळात)


आनंद अडसूळ ३ दिवसांपासून SRV रुग्णालयात आहेत. SRV रुग्णालयाबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


मास्क लावले तर मार्शलची गरज नाही.  पालिकेकडून रोख दंड वसुली बंद करण्याचा विचार करत आहोत. मार्शल जनता यांच्यातील वादामुळे हा निर्णय घेण्यात येऊ शकतो – महापौर किशोरी पेडणेकर


रविवारी रात्री उशिरा अंधेरी लोखंडवाला येथून NCBने एका ड्रग्ज पेडलरला ताब्यात घेतले.


कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असल्याने राज्य सरकारने ग्रामीण भागात इयत्ता 5 वी ते 12 वी आणि शहरी भागामध्ये इयत्ता 8 वी ते 12 वीपर्यंतचे वर्ग आजपासून सुरू होत आहेत. सोशल डिस्टन्सिंग राखता यावे यासाठी विद्यार्थ्यांना टप्प्याटप्यात बोलावण्यात येणार असून, काही शाळांनी तीन तासांचे नियोजन केले आहे. विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी यासाठी पहिल्या आठवड्यात वर्गात प्रत्यक्ष अभ्यास होणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -