Live Update : थोड्याच वेळात मातोश्रीवर सेना खासदारांची बैठक

Maharashtra Political crisis Eknath Shinde guwahati Uddhav Thackeray sharad pawar Anil Parab ED Inquiry pandharpur wari

थोड्याच वेळात मातोश्रीवर सेना खासदारांची बैठक


शरद पवार- उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला मातोश्रीवर सुरुवात


वर्णनात्मक स्वरुपाची परीक्षा घेतली जाणार, एमपीएससीचा निर्णय


मंगेश कुडाळकर यांच्या कार्यालयावर दगडफेक


अर्जून खोतकरांवर ईडीचा कारवाई


नरहळी झिरवळ यांच्याविरोधात अविश्वास प्रस्ताव


मविआचं अनैसर्गिक गठबंधन होते, ते टिकणार नव्हत- उदयनराजे भोसले

आज ना उद्या बंड होणे अपेक्षित होते


माझा फोटो न वापरता लोकांमध्ये वावरून दाखवा- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मेले तरी सेना सोडून जाणार नाही म्हणणारे पळून गेले, कोण काय वागलं याच जायचं नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे


चांदिवली मतदारसंघाचे आमदार दिलीप लांडे शिंदे गटात दाखल


आदित्य ठाकरे शिवसेना भवनात दाखल


आदित्य ठाकरेंच्या उपस्थिती उद्या संध्याकाळी शिवसेनेचा जाहीर मेळावा


शिवसेना आमदार दिलीप लांडे एकनाथ शिंदे गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीमध्ये दाखल


आदित्य ठाकरे मातोश्रीवरून निघाले, थोड्याच वेळात सेनेच्या जिल्हा प्रमुखांची घेणार बैठक


फडणवीसांच्या सागर बंगल्यावर प्रवीण दरेकर, आशिष शेलार, गिरीश महाजन, रत्ना गुट्टे, जयकुमार रावल, कालीदास कोळंबकर उपस्थित


भाजपचं राज्यपालांना पत्र, ठाकरे सरकार अंदाधुंद पद्धतीने शासकीय आदेश काढतेय, तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी


शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली झालेली महाविकास आघाडी सरकारची बैठक संपली


भाजपचे नेते सागर बंगल्यावर दाखल, देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वाखाली खलबत सुरुमुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला


शिंदेंच्या बंडाबाबत माहिती नाही- चंद्रकांत पाटील


शिवसेनेच्या नगरसेवकांची संध्याकाळी 7.30 वाजता तातडीची बैठक, उद्धव ठाकरेंनी बोलावली बैठक


शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचे राज्यातील सर्व जिल्हा संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांची महत्वाची बैठक आज दुपारी १२ वाजता शिवसेना भवनात होणार आहे.शिवसेनेचे भास्कर जाधवही नॉट रिचेबल, फोन लागत नसल्याने चर्चांना उधाण


शिवसेनेचं शिष्टमंडळ नरहरि झिरवळांच्या भेटीला, बैठकांना गैरहजर आमदारांवर कारवाईची मागणी


अग्निपथ योजनेविरोधात संयुक्त किसान मोर्चाचं आज देशव्यापी आंदोलन

केंद्राच्या अग्निपथ योजनेविरोधात संयुक्त किसान मोर्चा आज देशव्यापी आंदोलन करणार आहे.


अनिल परब यांची सलग चौथ्या दिवशी ईडी चौकशी