Live Update : स्पेनमध्ये १ ते २ ऑक्टोबरला दहीहंडी स्पर्धा रंगणार

political update cm eknath shinde guwahati Karnataka Maharashtra border row shraddha murder case 26 11 Mumbai Attack

स्पेनमध्ये १ ते २ ऑक्टोबरला दहीहंडी स्पर्धा रंगणार

दहीहंडी स्पर्धेसाठी मुंबईतील गोविंदा पथक स्पेनला जाणार

३२ जणांचे पथक स्पेनला जाणार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोविंदा पथकाला आर्थिक मदत

मुंबईतील गोविंदा पथक स्पेनला रवाना होण्याआधी मुख्यमंत्र्यांच्या भेटीला

मानवी मनोऱ्याच्या स्पर्धेचे स्पेनमध्ये आयोजन

४० देशांचा स्पर्धेत समावेश


देशभरात २४७ जण एनआयएच्या ताब्यात; महाराष्ट्रातून ४३ जणांना अटक


खरी शिवसेना कोणाची हे निवडणूक आयोग ठरवणार

निवडणूक आयोगाच्या कार्यवाहिला स्थगिती नाही – कोर्ट

शिंदे गटाला सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा


MIM चे माजी नगरसेवक अज्जु नाईकवाडे यांना मारहाण करण्यात आली

शहरातील चिश्तीया या भरचौकात त्यांना मारहाण करण्यात आली आहे.

डोक्यात रॉड मारल्याने डोके फुटून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाला आहे.

उपचारासाठी त्यांना एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

जुन्या वादातून मारहाण झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

या घटनेनंतर पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.


पुण्याच्या आंबेगाव दरीत शालेय बस कोसळली, 44 विद्यार्थी जखमी


मुंबईचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात बढती?

सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी बढतीची शिफारस केली आहे


उच्च शिक्षणातील ईडब्ल्यूएस आरक्षणाचा निर्णय सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला

उच्च शिक्षण तसेच आर्थिक परिस्थितीच्या आधारावर सार्वजनिक रोजगाराच्या मुद्द्यांशी संबंधित आर्थिकदृष्ट्या दुर्बळ गटाच्या (EWS) आरक्षणाच्या घटनात्मक वैधतेशी संबंधित निकाल सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला.


निवडणुक आयोगाला चिन्हाबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार – कौल


संजय राऊत यांच्या जामीन अर्जावर 10 ऑक्टोबरला सुनावणी, राऊतांच्या जामिनाला ईडीचा विरोध, 10 ऑक्टोबरला ईडी उत्तर दाखल करणार


शिंदे गटाचे वकील कौल यांचा युक्तिवाद सुरु

10 मिनिटांच्या ब्रेकनंतर घटनापीठाचे कामकाज सुरु

अपात्रतेचा मुद्दा विधीमंडळाचा आहे- घटनापीठ

निवडणुक आयोग कोर्टाच्या निर्णयाची वाट का बघू शकत नाही? सिब्बल यांचा सवाल

अभिषेक मनुसिंघवी यांचा युक्तिवाद सुरु


पक्षात राहून शिंदे गट निवडणुक आयोगाकडे जाऊ शकत नाही- कपिल सिब्बल

कोर्टाचं कामकाज थांबवलयं, 5 न्यायाधिशांसोबत चर्चा सुरु

हकालपट्टी झाल्यावर कोणते अधिकार? कपिल सिब्बल यांचा सवाल

शिंदेंच सध्याचं स्टेटस काय हाच मूळ प्रश्न – सिबब्ल

अशा पद्धतीने कोणतेही सरकार उलथवता येईल- सिब्बल

फुटीर गट अपात्र ठरला, तर विधिमंडळ सदस्यत्वावर काय परिणाम? – कोर्ट

मूळ शिवसेना तुमची मग तुम्ही व्हीपचे पालन का केले नाही? कपिल सिब्बल यांची विचारणा

१० व्या परिशिष्टानुसार फुटीला मान्यता नाही – सिब्बल

शिंदे कोणत्या भूमिकेत निवडणूक आयोगाकडे गेले- सिब्बल

शिवसेनेच्या चिन्हाबाबत सगळ्यांनी बाजू मांडा- घटनापीठ

आयोगाच्या कामकाजात स्पष्टता यावी, कौल यांची कोर्टाला विनंती

ठाकरे गटासाठी कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरु

२९ जूनला सरकार स्थापन झाले, शपथविधी झाला

निवडणूक आयोगासोबत मूळ प्रकरणाचा विचार व्हावा


राज्यातील मनसे पदाधिकाऱ्यांची आज बैठक


महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी


संजय राऊतांच्या जामीन अर्जावर आज मुंबई सत्र न्यायालयात सुनावणी


अनिल देशमुख आज जामीनासाठीच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणीची करणार मागणी


राज्यात दोन दिवस गरब्याला रात्री 12 वाजेपर्यंत परवानगी, अंतिम निर्णय मुख्यमंत्री घेणार


कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील ई-पेड पासला न्यायालयाची मनाई


महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची आज बैठक


राज्यात 20 हजार पोलिसांची भरती केली जाणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे आश्वासन