घरदेश-विदेशLive Update : खोपोलीमध्ये 48 विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटली

Live Update : खोपोलीमध्ये 48 विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटली

Subscribe

खोपोलीमध्ये 48 विद्यार्थ्यांनी भरलेली बस उलटली

विद्यार्थी असलेल्या एका लक्झरी बसचा भीषण अपघात

- Advertisement -

मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांची सर्वोच्च न्यायालयात नियुक्ती


धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्या निवडणूक आयोगासमोर सुनावणी

- Advertisement -

शिंदे व ठाकरे गटाचे नेते उपस्थित राहण्याची शक्यता


चाकूरला सहलीला निघालेल्या स्कूलबसला एसटीची धडक; २२ जखमी, ६ जणांची प्रकृती गंभीर


शिवसेना कधीही संपणार नाही, विकास कामं एका रात्री होत नसतात – उद्धव ठाकरे

विरोधकांना वाटतं शिवसेना संपली – उद्धव ठाकरे

शिंदे फडणवीस सरकारकडून श्रेय घेण्याचं प्रयत्न सुरु

कर्नाटकचे मुख्यमंत्री माज असल्यासारखे बोलतात

कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई जोरात बोलतात मग आमचे मुख्यमंत्री का नाही बोलत?


राजकारणातील शॉर्टकटने देशाची प्रगती होणार नाही- पंतप्रधान मोदी

काही पक्ष स्वार्थी राजकारणात अडकले

देशाच्या राजकारणात विकृत प्रवृत्ती येऊ लागल्या आहे, सावध रहा- पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्रातील डबल इंजिनचं सरकार वेगाने काम करत आहे – पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान मोदींनी संकष्टी चतुर्थीनिमित्त नागपूरच्या टेकडीच्या गणपतीला केले नमन, मोदींनी मराठीतून केली भाषणाला सुरुवात.


पंतप्रधान मोदींच्या हस्ते नागपूरमधील विविध विकास कामांचं लोकापण


G20 परिषदेसाठी महाराष्ट्रात जोरदार तयारी सुरु आहे- एकनाथ शिंदे

महामार्ग परिसरात 35 हजार झाडं लावणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आज अनेक विकासकामाचं उद्धाटन, पंतप्रधान आल्याने माझ्यासाठी आनंदाचा, अभिमानाचा दिवस- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

या प्रकल्पाला जमीनी देऊ नये म्हणून अनेक अडचणी आल्या

या महामार्गाला बाळासाहेबांचं नाव दिल्याचा आनंद

महामार्ग पूर्ण न होण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले


एम्स नागपूर पंतप्रधान मोदींनी दिलेली मोठी भेट – नितीन गडकरी

महामार्ग बनवताना पाण्याचं संवर्धन – नितीन गडकरी

समृद्धी महामार्ग बनवताना 405 तलावांचं खोदकाम – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

महाराष्ट्रात 75 कोटींचे 6 एक्सप्रेस हायवे होणार आहेत- नितीन गडकरी

शिंदे, फडणवीसांच्या नेतृत्त्वात अनेक प्रकल्प पूर्ण, महाराष्ट्रात अनेक नवे प्रकल्प आले- नितीन गडकरी


पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे समृद्धी महामार्ग शक्य – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच समृद्धी महामार्गामधील काम उल्लेखनीय – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महामार्गासाठी 9 महिन्यात 700 किमी जमिनी मिळाल्या – देवेंद्र फडणवीस

शिंदेंच्या आधीच्या नेत्यांकडू महामार्गाला विरोध – देवेंद्र फडणवीस


पंतप्रधान मोदींना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शिवरायांची मूर्ती भेट


पंतप्रधान मोदींच्या हस्ते नागपूर एम्सचे उद्घाटन 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अत्याधुनिक सुविधांसह एम्स नागपूरचे उद्घाटन केले. जुलै 2017 मध्ये त्यांनी त्याची पायाभरणीही केली. हे रुग्णालय विदर्भाला आधुनिक आरोग्य सुविधा देणार असून गडचिरोली, गोंदिया आणि मेळघाट या आदिवासी भागांसाठी वरदान ठरणार आहे.


पीएम मोदींनी केली नागपूर एम्समधील प्रदर्शनाची पाहणी 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपुरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्सचे उद्घाटन केल्यानंतर रुग्णालयातील प्रदर्शनाची पाहणीही केली


PM मोदींनी नागपुरात वाजवला ढोल 

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील नागपूर दौऱ्यावर आहेत. दरम्यान, पंतप्रधान कार्यालयाकडून त्याचा एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला असून, त्यात ते ढोल वाजवताना दिसत आहे.


पंतप्रधान मोदींच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील समृद्धी महामार्गाचे उद्धाटन


पंतप्रधान मोदी समृद्धी महामार्गावर दाखल


पंतप्रधान मोदींच्या हस्ते मेट्रो प्रदर्शनाचे उद्धाटन, विद्यार्थ्यांसोबत मोदींचा मेट्रोतून प्रवास


पंतप्रधान फ्रीडम पार्क मेट्रो स्थानकावर दाखल


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते ‘वंदे भारत’ एक्सप्रेसला हिरवा झेंडा


पंतप्रधान मोदींचा ताफा नागपूर रेल्वे स्थानकाच्या दिशेने रवाना


पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर विमानतळावर दाखल

मोदींच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर


पंतप्रधान नरेंद्र मोदी ९.३० वाजता नागपूरात होणार दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज समृद्धी महामार्गाचे लोकार्पण

नागपूर आणि नाशिकला जोडणाऱ्या 520 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.


मनसे अध्यक्ष राज ठाकरे लवकरचं मुंबईत घेणार जाहीर सभा


आज हिमाचलचे नवे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू यांचा शपथविधी सोहळा, या सोहळ्यासाठी आज दुपारी 12 वाजात राहुल गांधी, प्रियंका गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि अशोक गहलोत उपस्थित राहणार


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -