Live Update : मुंबई पालिका लुटली गेली – नारायण राणे

BMC Budget 2023 Live Updates

मुंबई पालिका लुटली गेली – नारायण राणे

फडणवीसांना माजी मुख्यमंत्री बोलायला आवडत नाही

कुणाशी दगाफटका करणं ही आमची सवय नाही


फडणवीसांची आंगणेवाडीत जाहीर सभा

भराडीदेवीने कौल दिल्यामुळे आम्ही सत्तेत – देवेंद्र फडणवीस

चिपी विमानतळाचं श्रेय नारायण राणेंना

अडीच वर्षात मविआ सरकारने कोकणासाठी काहीच केलं नाही


आर्ट फेस्टिव्हलला उद्धव ठाकरेंची भेट

दादरच्या शिवाजी पार्कात आर्ट फेस्टिव्हल


मी काँग्रेसमधूनचं फॉर्म भरला, अपक्ष म्हणून फॉर्म भरला नाही- सत्यजीत तांबे

बाळासाहेब थोरात आणि वडिलांना सांगितल्यानंतर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला- सत्यजीत तांबे

काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील यांनी मला वडीलांच्या जागेवर निवडणूक लढवण्यास सांगितलं, पण मला वडिलांच्या जागेवर लढायचे नव्हते – सत्यजीत तांबे

देवेंद्र फडणवीसांनी सांगितले संधी द्या नाही, तर आमचा सत्यजीत तांबेंवर डोळा आहे.

माझा कार्यकर्त्यांच्या भावना फडणवीसांनी बोलून दाखवल्या

पक्षासाठी काम करुनही पक्षाने संधी दिली नाही.

काँग्रेससोबत आम्ही निष्ठेने राहिलो- सत्यजीत तांबे

आमच्या परिवाराला 2023 मध्ये काँग्रेसमध्ये 100 वर्षे पूर्ण होतील – सत्यजीत तांबे

निवडणुकीवेळी तांबे परिवारावर गंभीर आरोप झाले- सत्यजीत तांबे


मुंबई महापालिका अर्थसंकल्प -2023-

ठळक योजना, प्रकल्प यांसाठी महत्वाच्या तरतुदी
– — —— ——- ——— —— — ——- – —-
# कोस्टल रोड -: ३,५४५ कोटी रुपये

# मुंबई शहराचे सुशोभिकरण -: १७२९ कोटी रुपये

# समुद्राचे पाणी गोड – प्रकल्प -: २०० कोटी

# बेस्ट उपक्रमासाठी – ८०० कोटी रुपये

# प्राथमिक शिक्षण -:३३४७.१३ कोटी रुपये

# मलजल प्रक्रिया केंद्र -: २७९२ कोटी रुपये

# रस्ते कामे। -: २८२५.०६ कोटी

# पुलांची दुरुस्ती -: २१०० कोटी

# पर्जन्य जलवाहिनी – २५७०.६५ कोटी

# घनकचरा व्यवस्थापन -: ३६६.५० कोटी

# सफाई कामगारांसाठी घरे, -: ११२५
आश्रय योजना

# गोरेगाव – मुलुंड लिंक रोड – १०६० कोटी

# राणी बाग दरजोन्नती -: १३३.९३ कोटी

# देवनार कत्तलखान्याचा विकास -: १३.६९ कोटी

# आरोग्य -: ६३०९.३८

# भगवती रूग्णालय -: ११० कोटी

# गोवंडी शताब्दी रूग्णालय -: ११० कोटी

# एम टी अगरवाल रूग्णालय -: ७५ कोटी

# सायन रुग्णालय -: ७० कोटी

# भांडुप येथील सुपर
स्पेशालिटी रूग्णालय -: ६० कोटी

# वांद्रे भाभा रूग्णालय -: ५३.६० कोटी

# कुर्ला विभागात रूग्णालयासाठी -: ३५ कोटी
भूखंड विकास

# ऍक्वर्थ कुष्ठरोग रूग्णालय -: २८ कोटी

# नायर दंत रूग्णालय -: १७.५० कोटी

# कामाठीपुरा सिध्दार्थ / -: १२ कोटी रुपये
मुरली देवरा नेत्र रूग्णालय

# केईएम रूग्णालय -: ७ कोटी रुपये

# ओशिवरा प्रसूतिगृह -: ९.५० कोटी

# कूपर रूग्णालय -: ५ कोटी रुपये

# टाटा कंपाऊंड, हाजी अली -: २ कोटी रुपये
वसतिगृह

# केईएम रूग्णालयात -: १ कोटी
प्रोटॉन थेरेपी कर्करोग उपचार

# मलनि:सारण प्रकल्प -: ३५६६.७८ कोटी रुपये

# पाणीपुरवठा -: १३७६ कोटी

# जल अभियंता -: ७८० कोटी

# जलबोगद्याची कामे -: ४३३ कोटी

# मलनि:सारण -: ३६४ कोटी

# २ हजार दशलक्ष लिटर -: ३५० कोटी
क्षमतेचा जलशुद्धीकरण प्रकल्प

# मुंबई मलनि:सारण सुधारणा -: ३०० कोटी

# कुलाबा आधुनिक -: ३२ कोटी रुपये
जलप्रक्रिया केंद्र

# पोयसर, दहिसर आदी नद्यांचा विकास -: ५८२.३१ कोटी रुपये

# सायकल ट्रॅक -: १८ कोटी

# मिठी नदी प्रकल्प -: ६५४.३१ कोटी

# घनकचरा व्यवस्थापन -: १७३३५ कोटी
वेस्ट टू एनर्जी

# दहिसर ते मीरा -: २२ कोटी
भाईंदरपर्यन्त रस्ता

# शिरोडकर मंडई विकास -: ३ कोटी

# क्रॉफर्ड मार्केट -: ३० कोटी

# पिंजाळ धरण प्रकल्प -: फक्त ३० ला


मुंबईतील नागरिकांना भेडसावणाऱ्या शिक्षण, पाणी, गार्डन, शौचालय आदी नागरी सुविधाबाबत हरकती – सूचना मागवल्या होत्या. जनतेने 965 सूचना दिल्या. त्यात 9 मीटर रुंदीचे रोडला पदपथ नाहीत, त्या सर्व रोडवर फुटपाथ बनवावे, अशी मागणी होती. त्यानुसार येत्या वर्षात प्रत्येक रोडवर फुटपाथ बनवणार

रस्त्यांसाठी 2836 कोटींची तरतूद, 3 वर्षात 100 टक्के सीसीरोड हा संकल्प

यंदा आरोग्य, पर्यावरण, शिक्षण साठी 6300 कोटींची तरतूद

बाळासाहेब ठाकरे आरोग्य हेल्थ केअर मुंबईत 100 दवाखाने सुरू करणार होतो. त्यापैकी 106 सुरू आहे. 102 दवाखाने मार्चपर्यंत पूर्ण करणार आहोत. म्हणजे डबल दवाखाने सुरू करणार.

270 क्लिनिक सुरू करणार. आतापर्यंत 2 लाख लोकांनी उपचार घेतले. 270 कार्यान्वित झाल्यास 40 लाख लोक उपचार घेतील, असा अंदाज आहे.

पर्यावरणासाठी नेट झिरो ही संकल्पना अमलात आणली असून वातावरण कृती आराखडा तयार करण्याचे काम प्रगती पथावर आहे.

मुंबईतील प्रकल्प कामे, धूळ आणि सतत लागणाऱ्या आगीमुळे वातावरण दूषित झाले.

कोविड नंतर भरमसाठ प्रदूषण वाढले

हे प्रदूषण टाळण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेप्रमाणे मुंबई स्वच्छ व शुद्ध हवेसाठी ‘मुंबई वायू प्रदूषण कृती योजना’ आखली आहे.

महापालिकेच्या 9 आणि 10 वर्गात 41774 मुलं शिकतात. मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी कौशल्य विकास योजना राबवण्याची सूचना केली. त्यानुसार मुंबई मनपाच्या हायस्कूल मध्ये ‘मुंबई पब्लिक स्किल सेंटर’ सुरू करू.

मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी निर्देश दिले होते. योजना सुचवल्या होत्या. त्यानुसार 15 वर्षावयाच्या नागरिकांचा सर्व्ह केला. मुंबईत 22 लोकांना हायपर टेंशन आहे. मुंबईत हायपर टेन्शन वाढले.

मुंबईत डायबेटीस, शुगर 20.3 लोकांना आजार

दोन धोक्याच्या आजारावर उपाययोजना कराव्या, अशा लेखी सूचना दिल्या होत्या. त्याबाबत या अर्थसंकल्पात तरतूद केली आहे.

35 लाख लोक मुंबईत राहतात. त्यांच्यासाठी योजना आखली आहे. आशा वर्कर, आरोग्य सेविका यांच्या मार्फत आरोग्य तपासणी केली जाईल. घरोघरी जाऊन तपासणी करणार

सध्या 106 दवाखान्यात तपासणी केली जाते. त्यात 270 दवाखान्याची भर पडेल. नव्या वर्षात 68 वाढवणार

मनोरुग्ण असलेल्या 85 टक्के लोकांवर येथे सेंटर उभारून उपचार जातील.

थर्ड टेंशनमध्ये गेलेल्या लोकांचे समुपदेशन केले जाईल.

10 – 12 एक्स्पर्ट डॉक्टरांच्या मार्फत उपचार करणार

35 वयोगटातील 66 लाख लोकांवर प्रत्येक बुधवारी ट्रीटमेंट केली जाईल.

ज्यांना आजाराची माहिती नाही, अशांचे देखील समुपदेशन करणार


मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्पः

मुंबई सागरी किनारा रस्ता प्रकल्प (दक्षिण) पॅकेज I, II, IV ची सर्व कामे प्रगतिपथावर असून आजपर्यंत 69% काम पूर्ण झाले आहे. पॅकेज IV मधील पहिल्या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे आणि डिसेंबर 2022 पर्यंत गिरगांव चौपाटी ते प्रियदर्शिनी पार्क पर्यंतच्या दुस- या बोगद्याचे 90% (1875 मीटर) खोदकाम पूर्ण झाले आहे.

मान, सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 30.09.2022 च्या निर्णयान्वये बृहन्मुंबई महानगरपालिकेला सागरी किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत भूमिगत पार्किंग क्षेत्राचे बांधकाम करण्यास परवानगी दिली आहे. तसेच, पुनः प्रापण करुन तयार केलेले सुमारे 70 हेक्टर क्षेत्र हे मनोरंजन सुविधांसाठी हरीतपट्टा म्हणून विकसित करण्यास परवानगी देण्यात आली असून त्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने निविदा प्रक्रिया सुरु केली आहे.

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये या प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याचा आमचा निर्धार आहे.


गोरेगांव-मुलूंड जोडरस्ता प्रकल्प (जी.एम.एल.आर.): पहिल्या टप्यात, नाहर येथील रेल्वे मार्गावरील उड्डाणपूलाचे 70% काम पूर्ण झाले असून ते डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

दुस-या टप्यात, रस्त्यांच्या रुंदीकरणाचे (गोरेगांव पूर्व आणि मुलुंड पूर्व) 65% काम पूर्ण झाले असून ते मे 2023 पर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.

तिस-या टप्यात, अ) मोठे उड्डाणपूल आणि त्रिस्तरीय चक्रिय (elevated rotary) मार्ग (7% काम पूर्ण) ब) गोरेगांव पूर्व येथे पेटी बोगदा व जोड बोगदा (निविदा मागविण्यात आल्या आहेत) या कामांचा समावेश आहे.

बोगद्याच्या कामास सुरुवात झाल्यानंतर चौथ्या टप्यातील कामांकरीता निविदा मागविण्यात येतील.

रस्ते:

मान. मुख्यमंत्री, श्री. एकनाथ शिंदे यांच्या निर्देशांनुसार, 397 किमी लांबीच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत आणि नुकतेच, मान. पंतप्रधान, श्री नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते सदर कामाचे भूमीपूजन करण्यात आले आहे.

उर्वरीत रस्त्यांसाठी देखील पुढील आर्थिक वर्षात निविदा मागविण्याचा मानस आहे


मुंबई वाहनतळ प्राधिकरण:

विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली, 2034 मध्ये अनिवार्य केल्याप्रमाणे, मुंबई वाहतूक पोलिस आणि राज्य परिवहन विभागाच्या भागीदारीने, व्यावसायिक, नगररचनाकार वाहतूक व संकल्पचित्रकार, धोरण संशोधक, तज्ञ आणि भौगोलिक माहिती प्रणाली (GIS) तंत्रज्ञ यांच्या टिमसह मुंबई वाहतूक प्राधिकरणाच्या स्थापनेचे काम हाती घेतले आहे.

मुंबईकरांची सार्वजनिक सुरक्षितता, सोय आणि सार्वजनिक हितासाठी मुंबई वाहनतळ प्राधिकरणाची नियुक्ती करण्यात आली असून माहिती तंत्रज्ञान उपाययोजना, वाहतूक चिन्हे, रेखांकने आणि सुनियोजित संदेशवहन याद्वारे रस्त्यांवरील प्रवासाच्या अनुभवाचा एकूणच दर्जा उंचावण्यास मदत होईल. ही पायाभूत सुविधा भारतात एकमेवाद्वितीय असेल.

वाहनतळांद्वारे मिळणारे उत्पन्न हे इतर कामांसोबतच वाहनतळांच्या पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची सुधारणा तसेच पादचारी सुविधांकरीता वापरण्यात येईल.


मलजल प्रक्रीया केंद्रः

नुकतेच दि.19 जानेवारी 2023 रोजी

एकूण 2464 द.ल.लि. प्रतिदिन क्षमतेच्या धारावी, मालाड, वर्सोवा, घाटकोपर, भांडुप, वांद्रे आणि वरळी येथील 07 मलजल प्रक्रीया केंद्राचे मान. पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी जी यांच्या हस्ते भूमीपूजन करण्यात आले.

. या सात मलजल प्रक्रीया केंद्राची संकल्पचित्र व बांधकाम, मालमत्ता पुनर्स्थापना आणि प्रचालन व परिरक्षणाचा एकुण प्रकल्प खर्च ₹27309.83 कोटी इतका आहे


महत्वाच्या सर्वसाधारण तरतूदी 2023-24

सागरी किनारा रस्ता प्रकल्प ₹3545 कोटी

प्राथमिक शिक्षणाकरीता तरतूद ₹3347.13 कोटी

मलनि:सारण प्रक्रिया प्रकल्प (STP) ₹2792 कोटी > रस्त्यांच्या सुधारणेकरीता तरतूद ₹2825.06 कोटी

> पूलांकरिता एकूण तरतूद ₹2100 कोटी (रेल्वे रुळांवरील आणि रुळांखालील बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीतील पूलांचे MRIDCL द्वारे निष्कासन आणि पुनर्बांधणी ₹400 कोटी या कामासह)

पर्जन्य जलवाहिन्यांकरिता तरतूद ₹2570.65 कोटी (बृहन्मुंबईमध्ये मिठी नदी आणि इतर नदी/नाले रुंदीकरण/वळविण्याचे काम (टप्पा || व III) ₹654.44 कोटी, नद्यांच्या पुनर्जिवनाकरीता तरतूद ₹582.31 कोटी, उदंचन केंद्राची उभारणी (मोगरा, माहूल उदंचन केंद्र) ₹200 कोटी या कामांसह)

घनकचरा व्यवस्थापन आणि घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प ₹366.50 कोटी

आश्रय योजनेकरीता तरतूद ₹1125 कोटी

> गोरेगाव-मुलुंड जोडरस्ता प्रकल्प (GMLR) ₹1060 कोटी

वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयाच्या आधुनिकीकरण आणि दर्जोन्नतीकरीता तरतूद ₹133.93 कोटी देवनार पशुवधगृहाच्या आधुनिकीकरणाकरीता तरतूद ₹13.69 कोटी


आरोग्याकरिता विशेष तरतूदी 2023-24

> आरोग्य सुविधांवरील अंदाजित खर्च ₹6309.38 कोटी इतका असून तो एकूण अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 12% इतका आहे.

> भगवती रुग्णालयाचा पुनर्विकास ₹110 कोटी

गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयाचे बांधकाम ₹110 कोटी

एम. टी. अगरवाल रुग्णालयाचे विस्तारीकरण ₹95 कोटी

कांदिवली (प) येथील शताब्दी रुग्णालयाचे प्रस्तावित बांधकाम ₹75 कोटी

> सायन रुग्णालय इमारतीचा पुनर्विकास ₹70 कोटी

> एस विभाग, भांडूप येथील प्रस्तावित मल्टी स्पेशालिटी महानगरपालिका रुग्णालय ₹60 कोटी

> वांद्रे येथील के. बी. भाभा रुग्णालयाचे विस्तारीकरण ₹53.60 कोटी

अर्थसंकल्पीय अंदाज 2023-2024

> एल विभागातील संघर्ष नगर येथे, रुग्णालयाकरीता राखीव असलेल्या भूखंड क्र. 11A/4 चा विकास ₹35 कोटी


जल व मलनिःसारण प्रकल्पासाठी भांडवली तरतूद 2023-24

बृहन्मुंबई महानगरपालिका

> मुंबई मलनिःसारण प्रकल्प (एमएसडीपी) ₹3566.78 कोटी

> पाणी पुरवठा प्रकल्प ₹1376 कोटी

> जल अभियंता ₹780 कोटी

> जलवहन बोगद्यांची बांधकामे 2433 कोटी

> मलनिःसारण प्रचालन ₹364 कोटी

> 2000 द.ल.लि. प्रतिदिन क्षमतेचा नविन जलशुध्दीकरण

प्रकल्प ₹350 कोटी

> मुंबई मलनिःसारण सुधारणा कार्यक्रम (एमएसआयपी) ₹300 कोटी

★ 200 द.ल.लि. प्रतिदिन निःसारीकरण प्रकल्पाची मनोरी येथे उभारणी ₹200 कोटी

> कुलाबा येथे ‘आधुनिक तृतीय स्तर जल प्रक्रीया केंद्र ₹32 कोटी

संकल्पीय अंदाज 2023-2024


कोविड-19 खर्चाची प्रतिपूर्ती  30 जून 2022 पर्यंत झालेल्या ₹3900.05 कोटी (मुंबई शहर ₹1941.94 कोटी आणि मुंबई उपनगर ₹1958.11 कोटी) इतक्या खर्चाच्या प्रतिपूर्ती राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून (SDRF) करण्याकरीता जिल्हाधिकारी, मुंबई शहर आणि मुंबई उपनगर याच्याकडे प्रतिपूर्ती दावा सादर करण्यात आला आहे.

बेस्ट उपक्रमास अर्थसहाय्य:

सन 2022-23 मध्ये, बेस्ट उपक्रमास ₹1382.28 कोटी इतक्या आगाऊ रकमेचे अधिदान करण्यात आले आहे.

सार्वजनिक वाहतूकीचे महत्व लक्षात घेऊन, उपक्रमाच्या प्रचालन व्यवस्थेस सहाय्य म्हणून सन 2023-24 च्या अर्थसंकल्पीय अंदाजामध्ये ₹800 कोटी इतकी तरतूद प्रस्ताविण्यात आली आहे.

विविध निकषांनुसार कामगिरी उंचावून तसेच संरचनात्मक सुधारणांद्वारे बेस्ट त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून मिळणा-या सहाय्यावरील अवलंबत्व नजिकच्या काळात कमी करेल, अशी आम्ही आशा व्यक्त करतो,


नवे प्रकल्प हाती न घेता, असलेले प्रकल्प पूर्ण करण्यावर भर देणार – आयुक्त इक्बालसिंह चहल


यंदा मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात 14.52 टक्क्यांची वाढ


अर्थसंकल्पात गोरेगाव मुलुंड लिंक रोडसाठी 1060 कोटी रूपयांची


पर्जन्य जलवाहिन्यांसाठी 2570 कोटी रुपयांची तरतूद


मुंबईचा वाढत्या प्रदूषण नियंत्रणासाठी अर्थसंकल्पात दीड हजार कोटींची भरीव तरतूद


मुंबईच्या अर्थसंकल्पात यंदा भायखळामधील राणीच्या बागेसाठी 140 कोटींची तरतूद, तर  गेट-वे ऑफ इंडियाचं सुशोभिकरण होणार


मुंबई अग्निशमन दलासाठी 227 कोटींची तरतूद


मुंबई पालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात रस्ते आणि पुलांसाठी 4925 कोटी रुपयांची तरतूद


मुंबई पालिकेचं बजेट सादर, यंदाचं बजेट 52 हजार 619 कोटी रुपयांचं… बजेटमध्ये 6 हजार 670 कोटींची वाढ


मुंबई महापालिकेचा सन २०२३ – २४ चा अर्थसंकल्प सादर

मुंबई महापालिकेचा सन २०२३ – २४ चा ५२,६१९.०७ कोटींचा ६५.३३ कोटी शिलकीचा अर्थसंकल्प मुंबई महापालिका आयुक्त व प्रशासक इकबाल चहल यांना शनिवारी सकाळी १०.४२ वाजता मुंबई महापालिका मुख्यालयात सादर करण्यात आला.
तत्पूर्वी, मुंबई महापालिकेचा शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी सकाळी १०.४१ वाजता तर यंदाचा संपूर्ण अर्थसंकल्प अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू यांनी सकाळी १०.४२ वाजता प्रशासक व पालिका आयुक्त इकबाल चहल यांना सादर केला.


मुंबई महानगरपालिकेत प्रथम शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प सादर


मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पाला सुरुवात


शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे सोमवारी नाशिक दौऱ्यावर


मुंबई महानगरपालिकेचा आज अर्थसंकल्प होणार सादर

या अर्थसंकल्पातून मुंबईला काय मिळणार याकडे सर्वांच लक्ष


मालवणमधील आंगणेवाडीच्या भराडी देवीची आज यात्रा

या यात्रेनिमित्त भाजप नेते नितेश राणे यांनी घेतली सभेच्या तयारीचा आढावा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यात्रेला राहणार उपस्थित


नवनिर्वाचित आमदार सत्यजीत तांबे आज पत्रकार परिषद घेणार

दुपारी 4 वाजता कालिका मंदिर ट्रस्टच्या कार्यालयात सत्यजीत तांबे यांची पत्रकार परिषद होणार ,

या पत्रकार परिषदेतून ते भूमिका मांडण्याची शक्यता