Live Update : जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं निधन

Live update Maharashtra Politics Maharashtra politics CM Eknath Shinde Deputy CM Devendra Fadnavis Uddhav Thackeray Khed Sabha Shiv Sena Thackeray group BJP Congress NCP MNS Sports IND VS AUS Cricket Kusti

जेडीयूचे माजी अध्यक्ष शरद यादव यांचं निधन

वयाच्या ७५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


बँक कर्मचाऱ्यांकडून 30 आणि 31 जानेवारी रोजी संपाचा इशारा

पाच दिवसांचा आठवडा, राष्ट्रीय पेन्शन योजना संपुष्टात आणावी यासह इतर मागण्या

संपामुळे बँका चार दिवस राहणार बंद (२८ ला चौथा शनिवार आणि रविवारची सुट्टी)


दिल्लीच्या IGI विमानतळावरून पुण्याला जाणाऱ्या स्पाइस जेटच्या विमानात बॉम्ब असल्याची चर्चा


कांजवाला प्रकरणी तीन पीसीआर आणि दोन ठाण्यांवर तैनात असलेले पोलीस निलंबित


ख्रिस्ती धर्मीयांवरील अत्याचारासंदर्भात अजित पवारांचं फडणवीसांना पत्र

ख्रिस्ती समाजावर अनेक ठिकाणी अन्याय, अत्याचार होत असल्याचं पत्रात नमुद

ख्रिस्तींवर धर्मांतराचा आरोप, ग्रंथांची विटंबना, धर्मगुरूंना मारहाणीच्या घटना


कर्नाटकात पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत त्रुटी, रोड शो दरम्यान तरुण पोहोचला वाहनाजवळ


मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात आयएनएस विक्रांत युद्धनौकेच्या प्रतिकृतीच्या प्रदर्शनाचे उद्घाटन


सत्यजीत पाटलांनी पाठींबा मागितला तर विचार करू – चंद्रशेखर बावनकुळे

भाजपाने कोणालाही एबी फॉर्म दिला नाही – चंद्रशेखर बावनकुळे

अजुन आमच्याकडे कुणाकणुनही पाठिंब्याची मागणी नाही – चंद्रशेखर बावनकुळे


ऑस्ट्रेलियातील मेलबर्न येथील BAPS स्वामीनारायण मंदिरात तोडफोड

खलिस्तानी समर्थकांनी हल्ला केल्याचा आरोप


शिंदे-फडणवीसांकडून मुंबई मेट्रो-अ, मेट्रो-7च्या कामाची पाहणी
शिंदे-फडणवीसांची गुंदवली मेट्रो स्थानकाला भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याआधी शिंदे-फडणवीसांकडून मेट्रोच्या कामाची पाहाणी


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शुक्रवारी जम्मू आणि राजौरीला देणार भेट


ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांना जामीन


इंद्रायणीच्या अर्जावर आज सुनावणी


अलिबागमध्ये ५० फूट मोठी मासेमारी करणारी बोट मध्यरात्री बुडाली

दोन खलाशांना वाचवण्यात यश, एक खलाशी अद्याप बेपत्ता


काँग्रेस, राष्ट्रवादीने आमचा खिमा केला- प्रकाश आंबेडकर

एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ सोडली तर विचार करु- प्रकाश आंबेडकर


ठाकरे गटाच्या मशाल चिन्हाबाबत समता पार्टी जाणार सर्वोच्च न्यायालयात


किरीट सोमय्या पुढच्या आठवड्यात जाणार कोल्हापूर दौऱ्यावर


संयुक्त किसान मोर्चाने पुन्हा दिली देशव्यापी आंदोलनाची हाक

26  जानेवारीला करणार देशव्यापी आंदोलनाची घोषणा

महाराष्ट्रातील संयुक्त किसान मोर्चात सामील संघटनांची पार पडली महत्त्वपूर्ण बैठक


बुलढाण्यातील सिंदखेराजा येथे माँ जिजाऊंचा जन्मोत्सव सोहळा

राजे लखुजीराव जाधव यांच्या वंशजाकडून होणार पूजन