Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश COVID 19 : रुग्णवाढीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर; केंद्राचे राज्यांना रुग्णालयात मॉक ड्रिल,...

COVID 19 : रुग्णवाढीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर; केंद्राचे राज्यांना रुग्णालयात मॉक ड्रिल, टेस्टिंग वाढवण्याचे आदेश

Subscribe

सात महिन्यानंतर देशात पुन्हा एकदा कोरोनाच्या केसेस वाढत आहेत. गेल्या २४ तासांत महाराष्टात कोरोनाचे ३ बळी गेले आहेत. देशभरात सर्वाधिक मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आहेत. केंद्रीय मंत्र्यांनी रुग्णालयात मॉक ड्रिल करुन सुविधांचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत.

नवी दिल्ली – देशभरात कोरोना रुग्ण संख्येचा आलेख वाढत आहे. गेल्या २४ तासांत देशात ६,०५० नवीन केसेस समोर आल्या आहेत. तर आतापर्यंत १४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अॅक्टिव्ह केसेसचा आकडा २८,३०३ पर्यंत पोहोचला आहे. दरम्यान केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी शुक्रवारी राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या आरोग्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. (Maharashtra ranks second in covid-19 cases)

मांडविय यांनी आरोग्य मंत्र्यांना १० आणि ११ एप्रिल रोजी सर्व रुग्णालयांचा दौरा करुन मॉक ड्रिल आणि आरोग्य व्यवस्थेचा आढावा घेण्यास सांगितले आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री म्हणाले, देशातील सध्याच्या कोरोना स्थितीचा आढावा घेतला आहे. राज्यातील आपातकालिन स्थिती आणि कोरोना हॉटस्पॉटची माहिती घेण्यास सांगितली आहे. त्यासोबतच टेस्टिंग, जिनोम सिक्वेंन्सिग वाढवण्याचे आदेश दिले आहेत. हॉस्पिटल्समध्ये मुलभूत सुविधा आहेत की नाही याची माहिती घेऊन त्या अधिक सक्षम करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय कोरोनाशी संबंधीत नियमांचे सक्तीने पालन करण्यास सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

मांडविया म्हणाले, आम्हाला घाबरण्याची नाही तर सतर्क राहण्याची गरज आहे. सध्या देशात ओमायक्रॉनचा सब-व्हेरियंट वेगाने पसरत आहे. यात हॉस्पिटलाईज होण्याची गरज नाही. (mandaviya said there is no need to panic there is a need to be alert)


टॉप पाच राज्यांमध्ये महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर
देशात गेल्या २४ तासांत ६०५० नवीन केसेस आढळल्या आहे. यातील ४०३७ केसेस या फक्त पाच राज्यातील आहेत. आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक रुग्ण केरळमध्ये आहेत. येथे १९३६ नवीन केसेस सापडल्या आहेत. त्यानंतर महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. राज्यात ८०३ केसेस आहेत. दिल्ली ६०६, हिमाचल प्रदेश ३६७ आणि गुजरातमध्ये ३२७ रुग्ण सापडले आहेत.

- Advertisement -

केरळ : येथे १९३६ नवीन रुग्ण समोर आले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. ७४२ लोक बरे झाले आहेत. याआधी सर्वाधिक केसेस (२३००) २२ सप्टेंबरला समोर आल्या होत्या.

महाराष्ट्र : येथे २४ तासांत ८०३ नवीन केसेस सापडल्या आहेत. ६८७ लोक बरे झाले असून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी महाराष्ट्रात ५६९ केसेस आढळल्या होत्या. येथे पॉझिटीव्हीटी रेट ७.०५% आहे.

दिल्ली : राजधानीत ६०६ नवीन प्रकरणे समोर आली आहेत. एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. तर ३४० लोक बरे झाले आहेत. अॅक्टिव्ह केसेस २०६० आहेत तर पॉझिटीव्हीटी रेट १६.९८% आहे.

हिमाचल प्रदेश : येथे गुरुवारी ३६७ केसेस आढळल्या आहेत. एकाचा मृत्यू झाला असून १३८ लोक बरे झाले आहेत. तर पॉझिटीव्हीटी रेट ७.३१% आहे.

गुजरात : येथे ३२७ केसेस समोर आल्या आहेत. एकाचा मृत्यू झाला असून ३६० लोक बरे झाले आहेत. बुधवारी येथली आकडा ३५१ होता. गुजरातमध्ये पॉझिटीव्हीटी रेट १.४५% आहे.

हेही वाचा : कोरोना वाढतोय, पण सरकारला गांभीर्य नाही; अजित पवारांचा हल्लाबोल

- Advertisment -