घरदेश-विदेशराज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात

राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत उत्तर प्रदेश पोलिसांच्या ताब्यात

Subscribe

काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांना उत्तर प्रदेश पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. उत्तर प्रदेशमध्ये दलित सरपंचाची हत्या करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नितीन राऊत हत्या झालेल्या सरपंचाच्या कुटुंबाला भेटण्यासाठी नितीन राऊत जात होते. मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांनी नितीन राऊत यांना आझमगडच्या सीमेवर रोखत पुढे जाण्याची परवानगी देण्यास नकार दिला. यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आलं. याबाबतची माहिती काँग्रेसने ट्विट करत दिली आहे. पोलिसांनी रोखल्यानंतर नितीन राऊत आणि त्यांच्या समर्थकांनी तिथेच रस्त्यावर बसून ठि्य्या आंदोलनास सुरुवात केली होती.

काँग्रेसने उत्तर प्रदेश पोलिसांच्या कारवाईचा निषेध केला आहे. “युपी सरकार दलित सरपंच सत्यमेव जयते यांची हत्या रोखू शकले नाही मात्र त्यांच्या घरी पोहोचणाऱ्या भावनांचा संदेश रोखत आहे,” असे ट्विट काँग्रेसने केले आहे.

- Advertisement -

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी आझमगड येथील बांसा गावातील दलित सरपंच सत्यमेव जयते उर्फ पप्पू राम यांची गोळी मारुन हत्या करण्यात आली होती. हल्ल्याची गंभीर दखल घेत अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाने सरकारला धारेवर धरले आहे. भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत उत्तर प्रदेश दौऱ्यावर गेले आहेत. मात्र, त्यांना उत्तर प्रदेश पोलिसांकडून रोखण्यात आले आहे. यानंतर नितीन राऊत यांनी तिथेच रस्त्यावर ठाण मांडत शांततेच्या मार्गाने निषेध नोंदवला.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -