घरदेश-विदेशकॅनडात खलिस्तानींचा धुमाकूळ, आणखी एका गांधी पुतळ्याची विटंबना, भारतीयांमध्ये रोष

कॅनडात खलिस्तानींचा धुमाकूळ, आणखी एका गांधी पुतळ्याची विटंबना, भारतीयांमध्ये रोष

Subscribe

बर्नाबी इथल्या एका विद्यापीठात असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे.

Gandhi Statue Vandalised in Canada: कॅनडात खलिस्तानी समर्थकांचा उपद्रव वाढत आहे. हिंदू मंदिरांवर हल्ले आणि भारतीय दूतावासांबाहेर आक्षेपार्ह घोषणा लिहिल्या गेल्याच्या घटनांनंतर आता महात्मा गांधींच्या पुतळ्यांची विटंबना केली जात आहे. बर्नाबी इथल्या एका विद्यापीठात असलेल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली आहे.

खलिस्तानी समर्थकांनी २३ मार्च रोजी कॅनडाच्या ओंटारियो प्रांतातील हॅमिल्टन शहरातील सिटी हॉलजवळ असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना केल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही समाजकंटकांनी महात्मा गांधींच्या पुतळ्याला स्प्रे पेंटिंगने रंगवून विटंबना केली. या घटनेनंतर, हॅमिल्टन पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणाचा तपास करत आहेत, परंतु अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

भारतीय प्रतिष्ठान आणि मंदिरांवर हल्ले वाढले
कॅनडा हा जगातील दुसरा सर्वात मोठा देश आहे, तो उत्तर अमेरिका खंडात येतो. गेल्या काही वर्षांत खलिस्तानी समर्थकांकडून भारतीय आस्थापना आणि मंदिरांवर हल्ले होण्याच्या घटना वाढत आहेत. २०२३ च्या सुरुवातीपासून संपूर्ण कॅनडामध्ये हिंदू मंदिरांना लक्ष्य करण्याची मालिका सुरू झाली आहे, ज्यामध्ये मंदिराच्या मूर्तींचे नुकसान करण्यापासून ते आक्षेपार्ह भित्तिचित्रे, विटंबना आणि तोडफोड अशा जवळपास डझनभर घटनांचा समावेश आहे.

- Advertisement -

हे ही वाचा : देशाच्या १३० कोटी लोकसंख्येवर अमित शाहांचं मोठं विधान, म्हणाले…

यापूर्वीही गांधी पुतळ्याचे नुकसान झाले होते
गेल्या वर्षी जुलैमध्ये ग्रेटर टोरंटो एरियातील रिचमंड हिल येथील विष्णू मंदिरातील महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली होती. त्यानंतर भारतीय समुदायाने निदर्शने केली होती. भूतकाळात भारतीय समुदायाच्या लोकांनी खलिस्तानी समर्थकांच्या गैरप्रकाराविरोधात भारतीय दूतावासाबाहेर निदर्शने केली, त्यानंतर कॅनडाच्या सरकारने भारतविरोधी कारवायांना आळा घालणार असल्याचे सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -