घरदेश-विदेशमहात्मा गांधी ते नरेंद्र मोदी; अमित शाहांनी गुजराती नेत्यांचे गायले गोडवे

महात्मा गांधी ते नरेंद्र मोदी; अमित शाहांनी गुजराती नेत्यांचे गायले गोडवे

Subscribe

देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील देशातील महत्त्वाच्या नेत्यांचे गोडवे गायले आहेत. राष्ट्रपीता महात्मा गांधी ते नरेंद्र मोदींपर्यंतच्या नेत्यांचे त्यांनी कौतुक केले आहे.

देशात नरेंद्र मोदी यांची नेतृत्वात सत्ता आली आणि त्यानंतर गुजराती समाजाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त झाले आहे. देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील देशातील महत्त्वाच्या नेत्यांचे गोडवे गायले आहेत. राष्ट्रपीता महात्मा गांधी ते नरेंद्र मोदींपर्यंतच्या नेत्यांचे त्यांनी कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत अमित शाह म्हणाले की, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, मोरारजी देसाई आणि नरेंद्र मोदी हे असे लोक आहेत ज्यांनी देशाच्या आधुनिकीकरणात अप्रतिम योगदान दिले आहे. (Mahatma Gandhi to Narendra Modi; Amit Shah praised Gujarati leaders)

मोदींच्या नेतृत्वामध्ये देशाचे गौरव होईल…
दिल्लीमध्ये श्री दिल्ली गुजराती समाजाला 125 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना अमित शाह म्हणाले की, आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचे डोके अभिमानाने उंचावले आहे. देशाचा गौरव होत आहे. भारत प्रगतीच्या मार्गावर असून देश वेगाने पुढे जात आहे.

- Advertisement -

नेत्यांच्या योगदानाचा केला उल्लेख…
गुजराती समाजातील चार नेत्यांच्या योगदानाचाही अमित शाह यांनी उल्लेख केला. याबाबत बोलताना ते म्हणाले की, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे काम महात्मा गांधी यांनी केले. सरदार पटेल यांनी देशाला एकत्र केले आणि मोरारजी देसाईंनी लोकशाही मजबूत केली. यासोबतच गृहमंत्री शाह म्हणाले की, पंतप्रधान मोदींमुळे देशाची छाती आता अभिमानाने रुंद झाली आहे आणि परदेशात भारताचा गौरव करण्यात येत आहे.

गुजराती लोकांमुळे नेहमीच देशाचा गौरव झाला आहे..
यावेळी बोलताना गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, गुजराती लोकांनी देशाला नेहमीच अभिमानाचा क्षण दिला आहे. गुजराती लोक जगातील अनेक देशांमध्ये स्थायिक आहेत आणि ते लोकांमध्ये सहज मिसळून जातात. सेवाभाव हे गुजराती लोकांचे वैशिष्ट्य असल्याचेही त्यांनी सांगितले. शाह यांनीही श्री दिल्ली गुजराती समाजाच्या कार्याचे कौतुक केले आणि या संस्थेमुळेच दिल्लीतील गुजराती समाजाला त्यांच्या संस्कृतीशी जोडून राहण्यास मदत झाल्याचे सांगितले.

- Advertisement -

2014 मध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी भारत जगातील 11वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होती, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उत्कृष्ट कामांमुळे देश आता 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे, असे सांगत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले आहे.


हेही वाचा – NHAI कंपनीची विक्रमी धाव, 100 तासांत 100 किमीच्या रस्त्याची निर्मिती

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -