घरदेश-विदेशGandhi Jayanti: 'या' कारणांमुळे महात्मा गांधींना नोबेल पुरस्कार नाकारण्यात आला

Gandhi Jayanti: ‘या’ कारणांमुळे महात्मा गांधींना नोबेल पुरस्कार नाकारण्यात आला

Subscribe

देशाच्या स्वातंत्र्य चळवळीत महत्वाचे योगदान असलेल्या महात्मा गांधींची आज १५२ वी जयंती देशभरात साजरी केली जात आहे. तसेच हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून देखील साजरा केला जातो. महात्मा गांधी यांनी अहिंसेच्या मार्गाने संपूर्ण जगाला प्रभावित केले. फक्त भारतातच नव्हे तर जगभरात शांतता टिकून रहावी, यासाठी गांधीजी यांनी सातत्याने प्रयत्न केले. गांधी यांच्या याच विचारांचा प्रभाव मार्टीन ल्यूथर किंग ज्यूनिअर आणि नेल्सन मंडेला यासह जगातील अनेक नेते मंडळींवर पडला. महात्मा गांधी हे २० व्या शतकातील अहिंसेचे सर्वात मोठे प्रतीक होते. या कारणांमुळेच गांधींना तब्बल ५ वेळा शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन करण्यात आले होते. असे असतानाही शांतीचे दूत मानले जाणाऱ्या महात्मा गांधींना शांततेचा पुरस्कार मिळाला नाही.

दक्षिण आफ्रिकेतील महात्मा गांधींनी केलल्या कार्यामुळे आणि अहिंसेच्या मार्गाने भारतात सुरू केलेल्या लढाईची दखल घेत त्यांना १९३७, १९३८, १९३९ १९४७ आणि १९४८ यावर्षी शांततेच्या नोबल पुरस्कारासाठी नामांकित करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, महात्मा गांधींना १९३७ साली सर्वात पहिल्यांदा महात्मा गांधींचे नाव नोबेल पुरस्कारासाठी सुचवण्यात आले. हे नाव नॉर्व्हेचे खासदार ओले कोल्बजॉर्नसन यांनी सुचवले होते. कोल्बजॉर्नसन हे नोबेल पुरस्कार समितीचे सदस्य होते. याच समितीचे सदस्य असलेले जेकब वॉर्म मूलर यांच्या गांधीजींच्या बाबतीत असलेले नकारात्मक विचार आणि भूमिकेमुळे त्यांना हा पुरस्कार मिळाला नाही.

- Advertisement -

१९३८ आणि १९३९ साली नॉर्वेचे खासदार ओले कोल्बजॉर्नसन यांनी पुन्हा शांतीच्या नोबेलसाठी गांधींचे नाव सूचवले, मात्र समितीने त्या वर्षी गांधींचे नाव शॉर्टलिस्टच केले नसल्याचे समोर आले. त्यानंतर १९४७ साली भारतातून गांधींचे नाव गोविंद वल्लभ पंत, गणेश मावळणकर यांच्याकडून नोबेल पुरस्कारासाठी सूचवले गेले होते. “समितीच्या काही सदस्यांकडून या बाबतीत सकारात्मकता आहे. पण सर्व सदस्यांची याला मान्यता नाही. पाकिस्तानशी संबंध बिघडल्यानंतर गांधीजी म्हणाले की, मी युद्धाच्या विरोधात आहे. पण पाकिस्तानच्या हट्टी वागण्यामुळे आणि चुकीच्या धोरणांमुळे भारताला युद्ध करावं लागेल.” गांधींनी केलेले हे विधान हे युद्धाचे समर्थन करणारे आहे, असे मानण्यात आले. त्यामुळे १९४७ साली देखील त्यांना नोबेल पुरस्कार नाकारण्यात आला.

१९४८ साली गांधीजींचे नाव नोबेल शांती पुरस्कारासाठी सूचवले होते. मिळालेल्या माहितीनुसार, गांधींना शांततेचे नोबेल मिळावे म्हणून समितीला एकूण सहा पत्र मिळाली होती. पण नॉमिनेशनच्या शेवटच्या तारखेच्या पुर्वी दोन दिवस गांधीजींची हत्या करण्यात आली. यावेळी गांधीजी नोबेल पुरस्काराचे प्रबळ दावेदार होते. पण त्या आधीच त्यांची हत्या झाल्याने त्यांना हा पुरस्कार मिळाला नाही.


Jal Jeevan Mission: पंतप्रधान मोदी आज जल जीवन मिशन अ‍ॅप लाँच करणार

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -