नवी दिल्ली : केरळ उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुहम्मद मुस्ताक म्हणतात की, आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या काळापेक्षा शासन आणि समाजात जास्त आव्हाने आहेत. त्यामुळे त्यांच्या विचारांवर आधारित व्यवस्था रद्द करावी. “आज प्रशासनात अनेक आव्हाने आहेत. त्यामुळे महात्मा गांधींनी दिलेली ग्राम स्वराज किंवा पंचायती राज व्यवस्थेची कल्पना आता रद्द करावी. तसेच, त्यांनी विविध प्रकारच्या शासन आणि सत्तेचे केंद्रीकरण सुचवले आहे,” असे न्यायमूर्ती मुहम्मद मुस्ताक यांनी सोमवारी (17 फेब्रुवारी) सांगितले. (Mahatma Gandhi’s idea of village self rule needs to be scrapped say Justice Muhamed Mustaque)
हेही वाचा : ST Employees PF : एसटी महामंडळाची बिकट परिस्थिती, चार महिन्यांपासून कर्मचाऱ्यांचा पीएफ रखडला
कचरा व्यवस्थापनाचे उदाहरण देत, न्यायमूर्ती मुस्ताक यांनी एर्नाकुलम जिल्ह्यात अस्तित्वात असलेली विकेंद्रित व्यवस्था कशी कुचकामी ठरली आहे हे निदर्शनास आणून दिले. न्यायमूर्ती मुहम्मद मुस्ताक यांनी खुल्या न्यायालयात ही सूचना दिली आणि हे त्यांचे वैयक्तिक विचार असल्याचे सांगितले. बार अँड बेंचच्या अहवालानुसार, न्यायमूर्ती मुस्ताक सांगितले की, महात्मा गांधींनी ज्या प्रकारची गावाची कल्पना केली होती आणि ज्याला घटनात्मकरित्या समाविष्ट केले गेले आहे ते आता रद्द करावे असे माझे वैयक्तिक मत आहे. कारण आजच्या काळात प्रशासन खूप गुंतागुंतीचे झाले आहे. त्यावेळी फक्त लहान गोष्टी करायच्या होत्या. पण स्थानिक अधिकाऱ्यांसमोरील आव्हाने आता खूप मोठी झाली आहेत. नगररचना हे एक मोठे आव्हान म्हणून उदयास आले आहे.
“आजच्या काळात कचरा व्यवस्थापन हे आणखी एक मोठे आव्हान आहे. हे काम तळागाळात करता येत नाही. आपल्याकडे अनेक सहकारी संस्था आहेत. पण आता आपल्याकडे त्याचे व्यवस्थापन करण्यासाठी एक केंद्रीकृत अधिकार असायला हवा.” असे न्यायमूर्ती मुस्ताक म्हणाले आहेत. तसेच, “प्रत्येक पंचायत ही कचरा व्यवस्थापन करू शकत नाही. आपण संपूर्ण जिल्हा किंवा मोठ्या क्षेत्रांचे व्यवस्थापन करण्यासाठी एक मोठी संस्था तयार केली पाहिजे. एर्नाकुलम जिल्ह्यात, कक्कनड, थ्रिक्काकारा, एर्नाकुलम शहर इत्यादी वेगवेगळ्या स्थानिक संस्था आहेत आणि त्या सर्व कचरा व्यवस्थापन करतात परंतु एकाच क्षेत्रात असूनही, त्या सर्वांना वेगवेगळ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे. काय चालले आहे? कचरा व्यवस्थापनासारख्या समस्या सोडवता येत नाहीत. हे बदलण्याची वेळ आली आहे.” असेही ते म्हणाले.