महात्मा गांधींच्या चष्म्याची २ कोटी ५५ लाखांना विक्री; जाणून घ्या, कोण आहेत नवे मालक!

राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या सोन्याच्या कडा असलेल्या चष्म्याचा इंग्लंडमध्ये लिलाव झाला. महात्मा गांधी यांच्या गोल्ड प्लेटेड चष्म्याची रेकॉर्डब्रेक २.५५ कोटी रुपयांना (२,६०,००० पौंड) विक्री झाली. ऐतिहासिक किमतीला विक्री झालेला हा चष्मा त्यांना १९०० मध्ये भेट देण्यात आला होता, असे समजले जात आहे. या चष्म्याला १०,००० पौंड ते १५,००० पौंड मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. परंतु ऑनलाईन लिलावामध्ये बोली वाढत गेली व अखेर एवढी प्रचंड किंमत आली. ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन्सचे बोली कर्ता अँडी स्टोव यांनी बोलीची प्रक्रिया संपवताना म्हटले आहे की, अश्विसनीय वस्तूची अविश्वसनीय किंमत आली आहे.

नवीन मालक अमेरिकेन…

दक्षिण-पश्चिम इंग्लंडच्या उपनगरातील हनहम स्थित ‘ईस्ट ब्रिस्टल ऑक्शन’ कंपनीने लिलाव आयोजित केला होता. अमेरिकेच्या संग्रहकाने हा चष्मा खरेदी केला आहे. तर या चष्म्याने लिलावात केवळ नवीन मापदंडच निर्माण केले नाहीत तर ऐतिहासिक रूपानेही ते महत्त्वपूर्ण ठरले आहेत. हा अद्भुत लिलाव होता, ज्याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही. चष्म्याच्या लिलावाबाबत भारत, कतार, अमेरिका, रशिया, कॅनडा या देशांतील बोलीदारांसह जगभरातील लोकांना उत्सुकता होती. चष्म्याचा नवीन मालक अमेरिकेतील रहिवासी आहे.

चष्म्याच्या पूर्वीच्या मालकाने म्हटले आहे की, रक्कम तो आणि मुलगी विभागून घेणार आहेत. हा चष्मा ज्या अज्ञात व्यक्तीच्या कुटुंबाकडे होता, त्याला त्याच्या वडिलांनी सांगितले होते की, ते १९१० ते १९३० दरम्यान दक्षिण अफ्रिकेत ब्रिटीश पेट्रोलियममध्ये नोकरीस होते तेव्हा त्याच्या काकाने हा चष्मा भेट दिलेला होता.

ऑक्शन्स कंपनीचे लिलावकर्ते ऍण्डी स्टोव म्हणाले, ‘अविश्वसनीय गोष्टीला अविश्वसनीय किंमत मिळाली आहे. ज्यांनी बोली लावली त्यांचे धन्यवाद. या चष्म्याच्या लिलावातून आम्ही लिलावाचा विक्रमच केला नाही, तर याचं ऐतिहासिक महत्त्वही वेगळंच आहे.’

इंग्लंडमधील एका वृद्ध विक्रेत्याकडे गांधींजींचा हा चष्मा होता. या विक्रेत्याच्या काकांना महात्मा गांधींनी स्वत: हा चष्मा भेट दिला होते. ब्रिटीश पेट्रोलियममध्ये काम करत असताना १९१०-३० मध्ये गांधीजींनी त्यांना ही भेट दिली होती. महात्मा गांधी यांनी १९०० साली हा चष्मा घातला होता. त्यानंतर त्यांनी हा चष्मा भेट म्हणून दिला. या चष्म्याची अंदाजे किंमत ९.७९ ते १४.६८ लाख रुपये आहे. लिलावात कंपनीला १४ लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम मिळण्याची अपेक्षा होती.


हा आहे सरकारचा Corona test बाबत नवा निर्णय!