घरताज्या घडामोडीवॉशिंग्टन डीसीमध्ये शेतकऱ्यांच्या समर्थनात आंदोलन; महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

वॉशिंग्टन डीसीमध्ये शेतकऱ्यांच्या समर्थनात आंदोलन; महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना

Subscribe

वॉशिंग्टन डीसीमध्ये शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी शीख समुदायातील अनेकांनी निदर्शने केली. यावेळी महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे.

केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या काही दिवसांपासून पंजाब आणि हरयाणाच्या शेतकऱ्यांचे दिल्ली सीमेवर आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकारने संसदेत आणलेले तीन कृषी कायदे रद्द करावे, अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. दरम्यान, या आंदोलनाचे लोण आता परदेशांमध्येही पसरलेले पाहायला मिळत आहे. वॉशिंग्टन डीसीमध्ये शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी शीख समुदायातील अनेकांनी निदर्शने केली. यावेळी महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचा दुर्दैवी प्रकार समोर आला आहे.

खलिस्तानी झेंडे फडकावले

कृषी कायद्यांना विरोध करणाऱ्या काही आंदोलकांनी खलिस्तानी झेंडे फडकावले. तसेच त्यांनी महात्मा गांधींच्या पुतळ्यावर स्प्रे मारत पुतळा खलिस्तानी झेंड्यांनी झाकला. ही घटना समोर येताच भारतीय दूतावासांनी मेट्रोपॉलिटन आणि नॅशनल पार्क पोलिसांत तक्रार दाखल केली. दरम्यान, या प्रकाराची माहिती परराष्ट्र विभागाला देण्यात आली. त्यानंतर या घटनेबद्दल उपसचिव स्टीफन बीगन यांनी माफी मागितली आहे. बीगन यांच्या हस्तेच महिन्याभरापूर्वी गांधींच्या पुतळ्याचे दुसऱ्यांचा अनावरण करण्यात आले होते.

- Advertisement -

सरकार शेतकऱ्यांचे किती बळी घेणार

नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी राजधानी दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी सुरु केलेल्या आंदोलनात आतापर्यंत ११ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे सरकार अजून किती बळी घेणार, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -


हेही वाचा – दिल्ली-नोएडा सीमा केली खुली; संरक्षण मंत्र्यांच्या भेटीनंतर घेतला निर्णय


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -