Friday, April 9, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश Lockdown: उद्योगपती आनंद महिंद्रांचा यू टर्न, सीएमचे मानले आभार

Lockdown: उद्योगपती आनंद महिंद्रांचा यू टर्न, सीएमचे मानले आभार

Related Story

- Advertisement -

राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कडक निर्बंध जाहीर केले. याचदरम्यान कोरोना संसर्गाची साखळी पुन्हा तोडण्यासाठी राज्यात मिनी ५ एप्रिल ते ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला. परंतु या लॉकडाऊनला महाविकास आघाडी सरकारमधील काही नेते, विरोधी पक्ष नेते तसेच काही उद्योजकांनी कडाडून विरोध केला. यावेळी महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांनीही लॉकडाऊनला तीव्र विरोध दर्शवला होता.

यानंतर राज्यातील जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आनंद महिंद्रा यांचे नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला. परंतु आता आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहे. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत लॉकडाऊन जाहीर न केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार व्यक्त केले. या ट्वीटमध्ये आनंद महिंद्रा यांनी लिहिले की, लॉकडाऊन लागू न केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तुमचे आभार. सतत नव नव्या संघर्षांना समोर जाणाऱ्या छोट्या दुकानदारांबद्दल मला नेहमी वाईट वाटत राहते. आता कोरोना नियमांचे पालन करणे आपले कर्तव्य आहे जेणेकरून ही बंधने लवकरात लवकर हटवली जातील. हे ट्विट आनंद महिंद्रा यांनी मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग केले आहे.

- Advertisement -

याआधी आनंद महिंद्रा यांनी एक ट्विट करत लॉकडाऊनला विरोध दर्शवला होता. या ट्विटमध्ये त्यांनी लॉकडाऊनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लिहिले होते की, उद्धवजी, या लॉकडाऊनमुळे सर्वाधिक नुकसान गरीब, स्थलांतरित मजूर, आणि छोट्या उद्योजकांचे होत आहे. त्यामुळे लॉकडाऊन हे हॉस्पीटल किंवा इतर आरोग्य व्यवस्था उभारण्यासाठी वेळ मिळावा यासाठी लागू करण्यात आले होते. आपल्या आरोग्य व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करत मृतांचे प्रमाण कमी करण्यावर भर देऊयात. असे ट्विट महिंद्रा यांनी केले होते.

- Advertisement -

यानंतर आनंद महिंद्रांच्या ट्विटवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या टोला लगावत म्हटले होते की, मी त्यांचं नाव घेणार नाही, पण एका उद्योगपतीने सांगितलं की लॉकडाऊन करायचाय, तर आरोग्य सुविधा वाढवा. ते आपण करतोच आहोत. गेल्या वर्षभरात आपण आरोग्य सुविधा वाढवली, अजूनही वाढवतो आहोत. पण हे जे काही आपल्याला सल्ले देत आहेत, ज्या उद्योगपतींनी आरोग्य सुविधा वाढवायला सांगितलं. असे मुख्यमंत्री म्हणाले होते. परंतु आज आनंद महिंद्रा यांच्या ट्विटमुळे गेल्या दिवसांपासून सुरु असलेल्या वादावर पडदा पडला.


 

- Advertisement -