Maharashtra Assembly Election 2024
घरताज्या घडामोडीMahua Moitra : रद्द होणार महुआ मोईत्रांची खासदारकी? एथिक्स समितीच्या अहवालात कोणत्या...

Mahua Moitra : रद्द होणार महुआ मोईत्रांची खासदारकी? एथिक्स समितीच्या अहवालात कोणत्या शिफारशींचा दावा

Subscribe

नवी दिल्ली – पैसे घेऊन प्रश्न विचारण्याच्या प्रकरणात तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रांचे पाय दिवसेंदिवस खोलात चालल्याचं दिसत आहे. महुआ मोईत्रांबद्दल भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी मोठा दावा केला आहे.
त्यांनी म्हटलं आहे की लोकपाल यांनी आता महुआ मोईत्रांविरोधात सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. सीबीआयने या प्रकरणी चौकशी सुरु केली, तृणमूल काँग्रेस खासदारांना तुरुंगातही टाकले जाण्याची शक्यता आहे.

काय आहे निशिकांत दुबेंच्या पोस्टमध्ये 

निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावर या संबंधीची पोस्ट देखील केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की,
“लोकपाल यांनी आज माझ्या तक्रारीवरुन आरोपी खासदार महुआजी यांनी राष्ट्रीय सुरक्षा गहान ठेवून भ्रष्टाचार प्रकरणी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहे.”

- Advertisement -

दरम्यान, यावर महुआ मोईत्रांनी म्हटलं की, मीडिया माझी प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी फोन करत आहे, त्यांना माझं सांगण आहे, की सीबीआयला आधी अदानींच्या 13 हजार कोटी रुपये भ्रष्टाचार प्रकरणी एफआयआर दाखल करावा लागेल. त्या पुढे म्हणाल्या, राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा हा आहे, की सुंयक्त अरब आमिरातसह अदानी प्रमुख असलेल्या कंपन्या कशा पद्धतीने भारतीय बंदरं आणि विमानतळांची खरेदी करत आहे.” त्यांनी सीबीआय चौकशीवर मिश्किल शब्दात टिप्पणी करत म्हटले, “सीबीआयचे स्वागत आहे. त्यांनी यावे आणि माझ्या चपलांचे जोड मोजावे.”

- Advertisement -

काय आहे महुआ मोईत्रांवर आरोप

महुआ मोईत्रांविरोधात निशिकांत दुबे यांनी लोकपालांकडे तक्रार केली आहे. यात आरोप आहे की, त्यांनी उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांच्याकडून पैसे घेऊन संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर निशाणा साधणारे प्रश्न उपस्थित केले. त्यासोबत महुआ मोईत्रांवर आरोप आहे की, त्यांनी त्यांचे संसदीय लॉग-इन आणि पासवर्ड दर्शन हिरानंदानी यांना दिले होते. याबदल्यात त्यांना पैसे आणि इतर गिफ्ट मिळाले.

या आरोपांच्या चौकशीसाठी ससंदेच्या एथिक्स कमिटीसमोर महुआ मोईत्रा 2 नोव्हेंबरला हजर झाल्या होत्या. यावेळी बैठकीतून संतप्त होऊन महुआ मोईत्रा आणि बसपा खासदार दानिश अली बाहेर पडले होते. त्यांनी समितीच्या प्रश्नांवर आक्षेप घेत बैठकीवर बहिष्कार टाकला होता.
त्यांनी समितीवर आरोप केला होता की, समितीचे अध्यक्ष भाजप खासदार विनोद कुमार सोनकर यांनी महुआ मोईत्रा आणि दर्शन हिरानंदानी यांच्या वैयक्तिक संबंधांबद्दल प्रश्न विचारले. त्यासोबतच जय अनंत देहाद्राईबद्दलही प्रश्न उपस्थित केले होते.
महुआ मोईत्रांविरोधात सर्वप्रथम जय अनंत देहाद्राई यांनी सीबीआयकडे तक्रार केली होती. त्यानतंर भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी या प्रकरणी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांकडे तक्रार केली. त्यानंतर ओम बिर्लांनी एथिक्स कमिटीकडे हे प्रकरण सोपवले होते.

हिवाळी अधिवेशनात काय होणार?

एथिक्स कमिटीने चौकशीनंतर अहवाल तयार केला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पाचशे पानांच्या अहवालात महुआ मोईत्रांचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हा अहवाल लोकसभा अध्यक्षांना सादर केला जाणार आहे. त्यावर चर्चा करुन पुढील कारवाई केली जाईल. महुआ मोईत्रांवर संसदेत काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -