घरक्राइमबदायू सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

बदायू सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

Subscribe

उत्तर प्रदेशच्या बदायू जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे.

उत्तर प्रदेशच्या बदायू जिल्ह्यातील सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुजारी सत्यानारायण, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीला गुरुवारी रात्री एका भक्ताच्या घरातून ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्य आरोपी असलेल्या सत्यनारायण याच्या अटकेसाठी ५० हजाराचे बक्षीस घोषित करण्यात आले होते. घटना समोर आली त्यादिवशी सत्यनारायण गावातच लपून बसल्याचे समोर आले. तर इतर दोन आरोपी जसपाल आणि वेदराम यांना पोलिसांनी अगोदरच अटक केली होती.

भक्ताच्या घरातून केले अटक

बदायू सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी सत्यनारायण हा गावातील एका भक्ताच्या घरात लपून बसला होता. ही माहिती पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार; पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली. त्याच दरम्यान त्यांनी त्याचा फोन सुरु केला आणि पोलिसांनी तिच संधी साधत त्याचा फोन ट्रॅक केला. त्यात तो गावातील जवळच्या भागातच असल्याचे दिसून आले. त्याप्रमाणे पोलिसांनी सापळा लावून बदायू सामूहिक बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी सत्यनारायण लपून बसलेल्या घरावर धाड टाकत त्याला अटक केली.

- Advertisement -

नेमके काय घडले?

गावातील स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुासर, ३ जानेवारी, रविवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास दोन इसमांसहित असलेल्या कार चालकाने एका तरुणीला रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर फेकून पोबारा केला. त्यानंतर त्या पीडितीचे मध्यरात्रीच्या सुमारास निधन झाले. त्यानंतर हे देखील स्पष्ट झाले आहे की, या घटनेतील आरोपींनी पीडितीला कारमधून चंदौसी येथे रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. मात्र, तिचा त्यात मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.


हेही वाचा – ‘संध्याकाळी बाहेर पडली नसती, तर वाचली असती’, महिला आयोग सदस्याचं वक्तव्य!


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -