घरदेश-विदेशगुजरातच्या नवसारी डेपोत भीषण अपघात; तीन प्रवाशांना चिरडले

गुजरातच्या नवसारी डेपोत भीषण अपघात; तीन प्रवाशांना चिरडले

Subscribe

भरधाव वेगात येणाऱ्या बसने तीन जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना गुजरात मधील नवसारी डेपोमध्ये घडली आहे. या घटनेमध्ये तीन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अपघाताचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

गुजरात मधील नवसारी बस डेपोमध्ये भीषण अपघात झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. बस डेपोमध्ये भरधाव वेगात येणाऱ्या बसने तीन जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ गुजरातच्या नवसारी डेपोमधला असल्याचे समोर आले आहे.

कसा झाला हा अपघात

गुजरात मधील नवसारी बस डेपोमध्ये भरधाव वेगात येणारी बस फलाटावर चढली. या दरम्यान फलाट क्रमांक ३ वर बरेच प्रवासी बसच्या प्रतिक्षेत उभे होते. त्याच दरम्यान भरधाव वेगात येणाऱ्या बसने फलाटावर बसच्या प्रतिक्षेत असणाऱ्या तीन प्रवाशांना चिरडल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून जागीच दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर एकाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसर या घटनेमध्ये भद्रा दिपक पटेल (५७), वर्षा भावेश हलपटी (३५) कनयैलाल वेकारिया (४५) या तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर मोनिका नितेश पॉल या जखमी झाल्या आहेत. मात्र त्यांची प्रकृत्ती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत अजून किती प्रवासी जखमी झाले आहेत याबाबतची अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -