घरताज्या घडामोडीचीनमध्ये हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 17 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी

चीनमध्ये हॉटेलला लागलेल्या भीषण आगीत 17 जणांचा मृत्यू, 3 जण जखमी

Subscribe

एका हॉटेलला लागलेल्या आगीत 17 जाणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चीनमध्ये घडली आहे. ईशान्य चीनमधील चांगचुन शहरातील एका रेस्टॉरंटला आग लागली होती.

एका हॉटेलला लागलेल्या आगीत 17 जाणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना चीनमध्ये घडली आहे. ईशान्य चीनमधील चांगचुन शहरातील एका रेस्टॉरंटला आग लागली होती. या भीषण आगीत 17 जणांना आपला जीव गमवावा लागला असून, 3 जण गंभीर जखमी झाल्याचे समजते. (major fire in hotel at china 17 dead 3 injured)

ईशान्य चीनमधील चांगचुन शहरातील एका रेस्टॉरंटला आग लागल्याचे स्थानिकांनी सांगितले. ही आग दुपारी 12:40 वाजता लागल्याचे समजते. रेस्टॉरंटला आग लागल्यानंतर स्थानिक सरकारने वीबो सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे.

- Advertisement -

या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दलाच्या जवानांनी धाव घेतली. लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी अग्नीशमन दलाच्या जवानांनी शर्तीच्या प्रयत्नांनी बचावकार्य केले.

या आगीत जखमी झालेल्या नागरिकांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या आगीचे कारण अद्यार समोर आलेले नाही. घटनास्थळी सध्या चीनचे स्थानिक अग्निशमन दलाचे जवान, स्थानिक पोलीस हॉटेलला आग कशाने लागली याचा तपास लागली याचा तपास करत आहेत.

- Advertisement -

चीनमध्ये मागील रविवारही मोठा अपघात झाल होता. बस उलटल्याने हा अपघात झाला होता. बस उलटून 27 जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. या अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी स्थानिक पोलीस आणि बचाव यंत्रणांनी धाव घेत शर्तीच्या प्रयत्नांनी बचावकार्य सुरू केले. ‘ग्रामीण गुइझोउ प्रांतातील एका महामार्गावर हा अपघात झाला असून, या बसमधून 47 लोक प्रवास करत असल्याची माहिती पोलिसांनी सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दिली आहे.


हेही वाचा – अखेर मुहूर्त ठरला; चांदणी चौकातील पूल पाडणार, वाहतूक 9 तास राहणार बंद

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -