घरताज्या घडामोडीराष्ट्रपती मुर्मूंच्या सुरक्षेत मोठी त्रुटी, गृह मंत्रालयाने राज्य पोलिसांकडे मागितला अहवाल

राष्ट्रपती मुर्मूंच्या सुरक्षेत मोठी त्रुटी, गृह मंत्रालयाने राज्य पोलिसांकडे मागितला अहवाल

Subscribe

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षेत मोठी त्रुटी असल्याचे समोर आले आहे. द्रौपदी मुर्मू या राजस्थान दौऱ्यावर असताना हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी गृह मंत्रालयाने राज्य पोलिसांकडे राष्ट्रपतींच्या सुरक्षेमध्ये झालेल्या त्रुटीबद्दल अहवाल मागितला आहे. राष्ट्रपती पाली जिल्ह्यातील रोहट येथे गेल्या होत्या. येथे हेलिपॅडवरील त्रिस्तरीय सुरक्षा तोडून एक महिला थेट राष्ट्रपतींसमोर आली आणि त्यांच्या पाया पडली. यानंतर पोलीस अधिक्षकांनी तात्काळ महिलेला ताब्यात घेण्याचे निर्देश दिले आहेत.

महिलेला ताब्यात घेतल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये तिची चौकशी करण्यात आली. सदर महिला कनिष्ठ अभियंता असल्याचे समोर आले असून तिची सुटका करण्यात आली आहे.

- Advertisement -

द्रौपदी मुर्मू या रोहट जवळील ब्राह्मण गावात उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी आल्या होत्या. हेलिपॅडवर त्यांच्या सुरक्षेसाठी त्रिस्तरिय बंदोबस्त करण्यात आला होता. राष्ट्रपती खाली उतरुन कारच्या दिशेने जात असताना पाणी पुरवठा विभागातील कनिष्ठ विभागात तैनात असणारी महिला सुरक्षा तोडून राष्ट्रपतींच्या जवळ आली आणि त्यांच्या पाया पडली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी त्या महिलेला बाजूला सारले.

हा प्रकार निदर्शनास येताच पोलीस अधिक्षक गगनदीप सिंगला यांनी महिलेला ताब्यात घेण्याचे निर्देश दिले. त्यानंतर रोहट पोलीस ठाण्यात नेऊन तिची चौकशी करण्यात आली. यावेळी गृहमंत्रालयाने राज्य पोलिसांकडे अहवाल मागितला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : धक्कादायक! कर्नाटकमध्ये मेट्रोचा पिलर कोसळून मायलेकाचा मृत्यू


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -