घरताज्या घडामोडीMoney Laundering Case: दिल्लीत ईडीची मोठी कारवाई, मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरावर...

Money Laundering Case: दिल्लीत ईडीची मोठी कारवाई, मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरावर छापेमारी

Subscribe

दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि आपचे नेते सत्येंद्र जैन (Satyendra Jain)  यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. मनी लाँड्रींग प्रकरणात अटक करण्यात आलेले मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरावर ईडीने छापेमारी (ED custody) केली आहे. सकाळी पहाटेच्या दरम्यान ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.

ईडीने दिलेल्या माहितीनुसार, सेंट्रल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे पथक अजूनही सत्येंद्र जैन यांच्या निवासस्थानी आणि इतर अनेक ठिकाणी छापे टाकत आहे. ईडीने कोलकाता येथील एका कंपनीशी संबंधित हवाला व्यवहाराप्रकरणी ९ जूनपर्यंत ईडीच्या ताब्यात असलेल्या सत्येंद्र जैन यांच्या घरावर छापा टाकला आहे. ईडीचे पथक सध्या सत्येंद्र जैन यांच्या निवासस्थानी हजर असून शोध मोहीम राबवण्यात गुंतले आहेत.

- Advertisement -

हेही वाचा : हवाला प्रकरणी दिल्लीचे आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांना अटक

दिल्ली उच्च न्यायालयाने सत्येंद्र जैन यांच्या चौकशीदरम्यान वकिलाला उपस्थित राहण्याची परवानगी देण्याच्या कोर्टाच्या आदेशाला स्थगिती दिली. सत्येंद्र जैन यांना ईडीने ३० मे रोजी मनी लाँड्रिंगच्या एका प्रकरणात अटक केली होती.

- Advertisement -

न्यायमूर्तींनी या निर्देशाला आव्हान देणाऱ्या ईडीने याचिकेवर ३ जून रोजी आपला आदेश राखून ठेवला होता. आम आदमी पक्षाच्या नेत्याविरुद्ध कोणतीही एफआयआर किंवा तक्रार नोंदवण्यात आलेली नसल्यामुळे, त्यांच्या जबाब नोंदवताना वकिलांच्या उपस्थितीच्या अधिकाराचा दावा करू शकत नाहीत, असं न्यायाधिशांचं म्हणणं आहे.

कोर्टाच्या म्हणण्यानुसार, जर स्टेटमेंटची व्हिडीओग्राफी आणि ऑडिओ रेकॉर्डिंग करण्यात आली असेल तर ते कोणत्याही जबरदस्ती किंवा धमकीला दूर करू शकेल. न्यायालयाने या प्रकरणाची पुढील सुनावणी २४ ऑगस्ट रोजी ठेवली आहे.


हेही वाचा : दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना 9 जूनपर्यंत ईडी कोठडी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -