घरदेश-विदेशपेट्रोल, डिझेलच्या किंमतीत लिटरमागे मोठी कपात

पेट्रोल, डिझेलच्या किंमतीत लिटरमागे मोठी कपात

Subscribe

हे आहे मोठ्या शहरांचे दर

पेट्रोलियन कंपन्यांनी शुक्रवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कपात केली असल्याचे जाहीर केले. पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २६ पैसे तर डिझेलच्या दरात प्रति लिटर ३७ पैसे अशी कपात केली असल्याचे जाहीर करण्यात आले. आज शुक्रवारी मुंबईतील पेट्रोलचा दर ८७.८२ रूपये प्रति लिटर तर डिझेलचा दर ७८.४८ रूपये प्रति लिटर इतका झाला आहे. दिल्लीत डिझेल ७२.०२ रूपये प्रति लिटर दराने आज मिळत आहे, तर पेट्रोल ८१.१४ रूपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.

चेन्नईमध्ये पेट्रोल ८४.२१ रूपये प्रति लिटर, तर डिझेल ७७.४० रूपये प्रति लिटर दराने आज उपलब्ध आहे. तर कोलकात्यात पेट्रोल ८२.६७ रूपये प्रति लिटर आणि डिझेल ७५.५२ रूपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे. नॉयडामध्ये पेट्रोल ८१.६४ रूपये प्रति लिटर तर डिझेल ७२.३३ रूपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.

- Advertisement -

याआधी बुधवारीच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात होणे अपेक्षित होते. पण त्यादिवशी कोणताही बदल झाला नाही. याच आठवड्यात मंगळवारी पेट्रोलच्या दरात दिल्ली, कोलकाता आणि मुंबईत १७ पैशांची कपात करण्यात आली होती. तर चेन्नईत १५ पैसे प्रति लिटर कपात झाली होती. डिझेलच्या दरात दिल्ली आणि कोलकात्यात २२ पैसे तर मुंबईत २४ पैसे आणि चेन्नईत २१ पैसे प्रति लिटर अशी कपात करण्यात आली होती. गुरूवारी डिझेल १९ पैसे प्रति लीटर स्वस्त झाले. तर पेट्रोल १५ पैशांनी स्वस्त झाले.

कच्च्या तेलाला अच्छे दिन

- Advertisement -

पेट्रोलियम कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये कपात केली असली तरीही दुसरीकडे मात्र कच्च्या तेलाच्या किमतीला चांगलीच तेजी आली आहे. मेक्सिकोत झालेल्या वादळामुळे कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. मेक्सिकोत सैली वादळामुळे तेलाच्या उत्पादनावर परिणाम झाला होता. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती वाढल्या असल्याचे बोलले जात आहे. अमेरिकेतही तेलाच्या साठ्यात ९५ लाख बॅरल इतकी मोठी घट झाली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -