Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी पुलवामात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, 5 किलो IEDसह एकाला अटक

पुलवामात मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला, 5 किलो IEDसह एकाला अटक

Subscribe

जम्मू मधील पुलवामा परिसरातून 5 किलो IEDसह एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे पुलवामात मोठ्या दहशतवादी हल्लाचा कट उधळला. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 5 ते 6 किलो आयईडी (IED) जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आल्याचे ट्वीट काश्मीर झोन पोलिसांनी केले आहे.

पुलवामा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इश्फाक अहमद वानी असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. त्याला पुलवामा येथील अरिगाम येथून अटक करण्यात आली आहे.

- Advertisement -

बारामूल्लामध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा

4 मे रोजी ऑपरेशन ऑल आऊट सुरू असताना, बारामुल्लाच्या वानीगम पायरी क्रिरी भागात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले होते. दहशतवाद्यांकडून एके-47 जप्त करण्यात आली आहे. तर बारामुल्लामधील सुरक्षा दलांनी गावात दहशतवाद्यांच्या उपस्थितीबद्दल विशिष्ट माहिती मिळाली होती. त्यानंतर शोध मोहिमेला सुरूवात करण्यात आली.

- Advertisement -

काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवादी हल्ला

जम्मू आणि काश्मीरच्या राजौरीमध्ये शुक्रवारी भारतीय लष्कर आणि दहशतवाद्यांनमध्ये चकमक झाली. या चकमकीत भारतीय लष्कराचे पाच जवान शहीद झाले होते. राजौरीच्या मुठभेड जिल्ह्याच्या जंगलात दहशतवादी आणि भारतीय लष्करामध्ये चकमक झाली. त्यामुळे आता संपूर्ण राजौरीमध्ये इंटरनेटची सेवा बंद करण्यात आली आहे.


हेही वाचा : Wrestlers Protest: एक आरोप जरी सिद्ध झाला तर मी गळफास घेईन; बृजभूषण सिंह यांचा


 

- Advertisment -