ग्रीसमध्ये रेल्वेचा मोठा अपघात; दोन ट्रेन समोरासमोर धडकल्या, २६ जणांचा मृत्यू

Train Crash In Greece | बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ग्रीक शहरातील थेसालोनिकी आणि लारिस या दोन शहरांच्या मध्ये हा अपघात झाला आहे.

greece train accident
Twitter/Donbass Devushka

Train Crash In Greece | ग्रीसमधून भीषण अपघाताची माहिती समोर येत आहे. येथे दोन ट्रेन एकमेकांना धडकल्या आहेत. यामुळे आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला असून ८५ जण जखमी असल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू करण्यात आले असून जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ग्रीक शहरातील थेसालोनिकी आणि लारिस या दोन शहरांच्या मध्ये हा अपघात झाला आहे.

हेही वाचा – खारकोपर रेल्वे स्टेशनजवळ लोकलचे तीन डबे रुळावरून घसरले

मध्यरात्री एक पॅसेंजर ट्रेन (Passenger Train) आणि एक मालगडी (Freight Train) यांच्यात घडक झाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की या दोन्ही ट्रेनचे काही डबे रुळांवरून घसरले. तर, तीन डब्यांना आग लागली. पॅसेंजर ट्रेन असल्याने यातून अनेक प्रवासी प्रवास करत होते. त्यामुळे जवळपास २६ लोकांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १६ जणांचे मृतदेह सापडले आहेत. तर, इतरांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. तसंच, ८५ जण जखमी झाले असून यापैकी २५ जण गंभीर जखमी आहेत.

ग्रीसची राजधानी एथेंसपासून (Athens)  जवळपास २३५ मैल उत्तर भागात टेम्पीजवळ हा अपघात घडला. या अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Video Viral on Social Media) झाले आहेत. तेथे मोठ्या वेगाने बचावकार्य सुरू असल्याचं व्हिडीओच्या माध्यमासून स्पष्ट होत आहे. या अपघाताबाबत स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातामुळे तीन डबे रुळांवरून घसरले. तर तीन डब्यांना आग लागली होती. आग विझवण्यासाठी अग्नीशमन दलालाही पाचारण करण्यात आले होते.