Makar Sankranti 2022 : आज मकर संक्रातीच्या दिवशी चुकूनही करु नका ‘हे’ काम

आज 14 जानेवारीला देशभरात मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. जगभरात अनेक सण साजरे केले जातात. त्याचप्रकारे भारतील प्रत्येक सणामागे काहीना काहीतरी परंपरा किंवा प्रथा आहेत. त्याचप्रमाणे मकर संक्रातीला हिंदू धर्मामध्ये मोठे महत्त्व आहे. पौराणिक कथेच्या मान्यतेनुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव आपला पुत्र शनिच्या घरी जातात.

Makar Sankranti 2022: Don't do this mistake on Makar Sankranti
Makar Sankranti 2022 : आज मकर संक्रातीच्या दिवशी चुकूनही करु नका 'हे' काम

आज 14 जानेवारीला देशभरात मकरसंक्रांतीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. जगभरात अनेक सण साजरे केले जातात. त्याचप्रकारे भारतील प्रत्येक सणामागे काहीना काहीतरी परंपरा किंवा प्रथा आहेत. त्याचप्रमाणे मकर संक्रातीला हिंदू धर्मामध्ये मोठे महत्त्व आहे. पौराणिक कथेच्या मान्यतेनुसार, मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्य देव हे आपला पुत्र शनिच्या घरी जातात. शनि हा मकर आणि कुंभ राशिचा स्वामी आहे. त्यामुळे आजच्या दिवशी पिता-पुत्रांचे मिलन होते. ज्योतिषांच्या माहितीनुसार, मकरसंक्रांतीच्या दिवशी काही कामांना टाळले जाते. ज्यामुळे सूर्य देव नाराज होतात. जाणून घ्या मकरसंक्रातीच्या दिवशी कोणती कामे करु नये.

ज्योतिषी डॉ. अरविंद मिश्रा यांनी सांगितले की, मुहूर्त चिंतामणी ग्रंथानुसार मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त सूर्याच्या संक्रांतीच्या वेळेच्या 16 तास आधी आणि 16 तासांनंतरचा आहे. यावेळी 14 जानेवारीला सकाळी 7.15 वाजल्यापासून पुण्यकाल सुरू झाला असून तो संध्याकाळी 5.44 वाजेपर्यंत चालेल. त्यात स्नान, दान, नामजप करता येतो. दुसरीकडे, स्थिर विवाहाचा विचार केल्यास, म्हणजे महापुण्य काल मुहूर्त 9 ते 10:30 पर्यंत राहील. यानंतर दुपारी 1.32 ते 3.28 वाजेपर्यंत असणार.

चुकूनसुद्धा करु नका ‘ही’ कामे

  • मकरसंक्रातीच्या दिवशी चुकूनही रात्रीचे शीळे अन्न खाऊ नका.त्यामुळे तुमच्यातील राग आणि नकारात्मक ऊर्जा वाढते.
  • या दिवसांत लसूण,कांदा आणि मासाचे सेवन करु नका.
  • मसालेदार जेवण करणेही टाळा.
  • या दिवसांत चुकूनही नशापानी करु नका. दारु,सिगारेट,गुटखा यांसारख्या पदार्थांचे सेवन करु नये.
  • मकर संक्रातिच्या दिवशी आपल्या बोलण्यावर ताबा ठेवावा, जास्त राग करु नये.

मकरसंक्रातीच्या दिवशी काय करावे

  •  मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी पूजा करावी.
  • या दिवशी तीळ-गूळ आणि खिचडी दान करावी
  • मकर संक्रांतीच्या दिवशी काळे तीळ दान करण्याचे विशेष महत्त्व आहे.
  • मकर संक्रांतीच्या दिवशी जेवताना सात्त्विकतेचे पालन करा.

हेही वाचा – मेक इन इंडिया! मुंबईला मिळाले दुसरे रडार