घरदेश-विदेशMakar Sankranti 2022 : कोरोना संकटात हरिद्वारमध्ये स्नानावर बंदी; गंगासागरात जमले 3...

Makar Sankranti 2022 : कोरोना संकटात हरिद्वारमध्ये स्नानावर बंदी; गंगासागरात जमले 3 लाखांहून अधिक भाविक

Subscribe

त्याचवेळी हिंदूंचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असलेल्या प्रयागराजमध्ये माघ मेळा आणि कल्पवास या दोन्ही सणांना आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे देश-विदेशातील लाखो भाविक पवित्र गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर मकर संक्रांतीच्या सणानिमित्त पवित्र स्नान करत आहेत.

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने यंदाही सणांची मज्जा पूर्णपणे उधळून लावली आहे. यातच आज मकर संक्रांतीनिमित्त गंगा  स्नानाला खूप महत्त्व असते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हरिद्वार जिल्हा प्रशासनाने गंगेतील संक्रांती स्नान कार्यक्रमावर बंदी घातली आहे. हरिद्वारच्या हर की पैडी परिसरात बॅरिकेड करुन भाविकांच्या येण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. हर की पैडी आणि इतर गंगा घाटावर येणाऱ्या भाविकांना रोखण्यासाठी प्रशासनाकडून संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

संक्रांती स्नानावर बंदी घातल्यामुळे हर की पैडीसह संपूर्ण घाट परिसर निर्मनुष्य झाला आहे. तर आजची पहाटेची गंगा आरतीही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करण्यात आलीय. मकर संक्रांतीनिमित्त गंगा स्नानासाठी मोठ्या संख्येने भाविक हरिद्वारला येत असतात. मात्र कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे यंदाही जिल्हा प्रशासनाने या स्नानावर बंदी घातली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरत मोकळा मोकळा दिसतोय.

- Advertisement -

सीओ सिटी शेखर सुयाल म्हणाले की, पोलीस यंत्रणा प्रत्येक ठिकाणी उभी आहे. कारण कोरोना मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे ही आपली जबाबदारी आहे. आमचे पोलीस दल तप्तरतेने उभे आहे. घाट परिसर पूर्णपणे रिकामा आहे. लोकांची गर्दी होऊ नये यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. मेळा परिसराला चार झोन आणि आठ सेक्टरमध्ये विभागून पोलीस, पीएसी आणि निमलष्करी दल तैनात करण्यात आले होते. सीमेबाहेरून येणाऱ्या भाविकांना पोलीस परत पाठवत आहेत.

- Advertisement -

मात्र दुसरीकडे पश्चिम बंगालमधील गंगासागर येथे गंगा स्नानासाठी ३ लाख लोक जमले आहेत. त्याचवेळी हिंदूंचे सर्वात मोठे तीर्थक्षेत्र असलेल्या प्रयागराजमध्ये माघ मेळा आणि कल्पवास या दोन्ही सणांना आजपासून सुरुवात झाली आहे. त्यामुळे देश-विदेशातील लाखो भाविक पवित्र गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या संगमावर मकर संक्रांतीच्या सणानिमित्त पवित्र स्नान करत आहेत.


Makar Sankranti 2022: जाणून घ्या मकर संक्रांतीला सूर्य देवाची पूजा करण्याची योग्य पद्धत


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -