Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश कमल हसनचा पक्ष २० जागांवर निवडणूक लढवणार

कमल हसनचा पक्ष २० जागांवर निवडणूक लढवणार

Subscribe

ज्येष्ठ अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांचा आज वाढदिवस आहे. आजच्याच दिवशी त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. तामिळनाडूच्या आगामी विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांचा पक्ष २० जागा लढवणार असल्याचे सुतोवाच त्यांनी केले आहे. यासाठी या वीसही मतदारसंघात त्यांच्या पक्षाने कार्यकर्त्यांची फौज कामाला लावली आहे. पोटनिवडणूक कधी होणार हे कोणालाच आता माहीत नाही. मात्र आमचा पक्षा आतापासूनच निवडणुका लढवण्यासाठी सज्ज झाला असल्याचे कमल हसन यांनी आज सांगितले.

आपल्या ६४ व्या वाढदिवसानिमित्त कमल हसन यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “मी लोकांसाठी समर्पित आहे, मला पक्ष किंवा एका समाजासाठी काम करायचे नाही. जर आपण भ्रष्टाचाराला तिलांजली देऊ शकलो तर प्रत्येक राज्याची समृद्धी होईल.”

- Advertisement -

यावेळी पत्रकारांनी श्रीलंकेत चाललेल्या राजकीय घडामोडींवर देखील प्रश्न विचारले. मात्र या प्रश्नांना उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. ते म्हणाले की, आपल्या देशाचे अनेक प्रश्न सुटलेले नसताना आपण बाजुच्या देशातील घडामोडींवर बोलणे अनुचित नाही, असे ते म्हणाले.

तामिळनाडू विधानसभेच्या अध्यक्षांनी पक्षांतर बंदी कायद्याच्या आधारे एआयएडिएमके पक्षाच्या १८ आमदारांना मद्रास हाय कोर्टाने अपात्र ठरविले होते. त्यानंतर मद्रास हायकोर्टाने देखील हा निर्णय कायम राखला होता. त्यासोबतच थिरुवरुर आणि थिरुपराकुंदरम येथील आमदारांच्या मृत्यूमुळे या दोन जागा रिकाम्या झालेल्या आहेत.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -