घरदेश-विदेशहाफीज सईदचा मेव्हणा अब्दुल रहेमान मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

हाफीज सईदचा मेव्हणा अब्दुल रहेमान मक्की आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित

Subscribe

सोमवारी संयुक्त राष्ट्र परिषदेने पाकिस्तानातील आयएसआयएल व अल कायदा या अतिरेकी संघटनांशी संबंधी व्यक्ती, समूह व संस्थांची यादी जाहीर केली व त्यांना आंतरराष्ट्रीय अतिरेकी म्हणून घोषित करण्यात आले. त्यांची संपत्ती जप्त केली जाईल. त्यांच्या विमान प्रवासावर बंदी करण्यात आली आहे. त्यांना हत्यार वापरण्यास बंदी करण्यात येईल, असे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने स्पष्ट केले. 

नवी दिल्लीः पाकिस्तानी अतिरेकी हाफीज सईदचा मेव्हणा अब्दुल रहेमान मक्कीला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मक्कीचे नाव आंतरराष्ट्रीय अतिरेक्यांच्या यादीत टाकले आहे. मक्कीच्या नावाचा आंतरराष्ट्रीय अतिरेक्यांच्या यादीत समावेश करावा, अशी मागणी भारताने संयुक्त राष्ट्र परिषदेकडे केली होती. याला चीनने विरोध केला होता. अखेर सुरक्षा परिषदेने मक्कीला आंतरराष्ट्रीय अतिरेकी म्हणून घोषित केले आहे.

सोमवारी संयुक्त राष्ट्र परिषदेने पाकिस्तानातील आयएसआयएल व अल कायदा या अतिरेकी संघटनांशी संबंधी व्यक्ती, समूह व संस्थांची यादी जाहीर केली व त्यांना आंतरराष्ट्रीय अतिरेकी म्हणून घोषित करण्यात आले. त्यांची संपत्ती जप्त केली जाईल. त्यांच्या विमान प्रवासावर बंदी करण्यात येईल. त्यांना हत्यार वापरण्यास बंदी करण्यात येईल, असे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने स्पष्ट केले.

- Advertisement -

भारत व अमेरिकेच्याआधी पाकिस्तानने मक्कीला अतिरेकी घोषित केले आहे. मक्कीवर दहशतवाद पसरवण्याचा आरोप आहे. तरुणांना अतिरेकी संघटनांमध्ये भरती करणे. तरुणांची दिशाभूल करणे, अतिरेकी कारवायांसाठी पैसे गोळा करणे. जम्मू-काश्मिरमधे अतिरेकी कारवाया करणे, असा मक्कीवर आरोप आहे. अमेरिकेने बंदी आणलेल्या जागतिक अतिरेकी संघटनांमध्येही मक्कीचा सक्रिय सहभाग आहे.

पाकिस्तानी न्यायालयाने मक्कीला सन २०२० मध्ये शिक्षा सुनावली आहे. मक्कीवर दहशतावादी कारवाया केल्याचा आरोप आहे. भारताने दहशतवाद्यांची यादी जाहीर करण्याची मागणी केली की चीन त्यामध्ये खोडा घालतो. तरीही पाकिस्तानच्या अतिरेकी कारवायांना प्रतिबंध करण्याची मागणी वेळोवेळी भारत संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत करत असतो. त्यानुसार संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने मक्कीचे नाव जागतिक अतिरेक्यांच्या यादीत टाकले आहे.

- Advertisement -

मक्की हा हाफीज सईदचा मेव्हणा आहे. मुंबईवरील २६/११ च्या हल्ल्याचा मास्टरमाईंड असलेल्या सईदला गेल्या वर्षी पाकिस्तान न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. पाकिस्तानच्या दहशतवादविरोधी न्यायालयाने सईदला दहशतवादाच्या गुन्ह्यांत ही शिक्षा ठोठवली आहे. न्यायालयाने सईदला ३ लाख ४० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. टेरर फंडिंगशी संबंधित दोन खटल्यांच्या सुनावणीनंतर ही शिक्षा सुनावण्यात आली आहे.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -