Wednesday, May 31, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Malappuram disaster : बोट उलटल्याने २१ जणांचा मृत्यू, बहुतांश मुलांचा समावेश

Malappuram disaster : बोट उलटल्याने २१ जणांचा मृत्यू, बहुतांश मुलांचा समावेश

Subscribe

तिरुवनंतपुरम : केरळच्या मलप्पुरम (Malappuram disaster) जिल्ह्यातील तनूरमधून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. रविवारी (7 मे) रात्री उशीरा बोट उलटण्याने मोठी दुर्घटना घडली असून 21 जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस प्रशासन आणि एनडीआरएफच्या पथकाकडून लगेचच बचावकार्य सुरू करण्यात आले.  प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली आहे.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी बोटीमध्ये 40 जण होते असे समजते आणि या घटनेनंतर आतापर्यंत 21 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. या घटनेची माहिती सांगताना राज्यमंत्री व्ही अब्दुरहमान यांनी सांगितले की, केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात मृतांची संख्या 21 झाली आहे. मलप्पुरमचे प्रादेशिक अग्निशमन श्रेणी अधिकारी शिजू केके यांनी सांगितले की, बचावकार्य अजूनही सुरू आहे. बोटीत नेमके किती जण होते, याबद्दल माहिती मिळालेली नाही.  या दुर्घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आज तनूर अपघात स्थळाला भेट देणार आहेत. मुख्यमंत्री कार्यालयाने सांगितले की, सोमवार हा अधिकृत शोक दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच पीडितांना आदर म्हणून सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत.

पीएम मोदींकडून शोक व्यक्त
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून शोक व्यक्त केले आहे. शोकाकुल कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करताना त्यांनी मदतीची रक्कम जाहीर केली. पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधी (PMNRF) मधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपये दिले जाणार आहेत.

- Advertisement -

उपाध्यक्षांनीही शोक व्यक्त केला
मलप्पुरम बोट दुर्घटनेबद्दल उपाध्यक्ष जगदीप धनखर यांच्याकडून शोक व्यक्त करण्यात आले आहे. बोट दुर्घटनेतील जीवितहानीमुळे मला खूप दु:ख झाले असून, आपण शोकाकूल कुटुंबासोबत आहोत, असे त्यांनी शोक संदेशात म्हटले आहे.

- Advertisment -