घरCORONA UPDATEमलेरियाचे औषध ठरणार कोरोनावर प्रभावी! आयुष मंत्रालयाचा दावा, परीक्षणातून समोर आले फायदे

मलेरियाचे औषध ठरणार कोरोनावर प्रभावी! आयुष मंत्रालयाचा दावा, परीक्षणातून समोर आले फायदे

Subscribe

आयुष ६४ हे औषध कोरोना विषाणूच्या एसिम्पटोमॅटिक,हलक्या आणि सौम्य लक्षणांवर वापरता येऊ शकते

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले. दुसरी लाट थोपवण्यासाठी लसीकरणही सुरु करण्यात आले आहे. त्यात आता आयुष मंत्रालयाने आयुर्वेदीक औषध आयुष ६४ हे कोरोनावर प्रभावी ठरत असल्याचा दावा केला आहे. १९८० साली  मलेरियाच्या आजारावरही या औषधाचा वापर करण्यात आला होता. आताही कोरोनाच्या महामारित हे औषध कोरोनावर प्रभावी ठरत आहे. त्यामुळे कोरोनाच्या उपचारात या औषधाचा समावेश करण्यात आला आहे. आयुष मंत्रालयाने गुरुवारी याविषयी शिफारस केली. आयुष ६४ हे औषध कोरोना विषाणूच्या एसिम्पटोमॅटिक,हलक्या आणि सौम्य लक्षणांवर वापरता येऊ शकते, असे आयुष मंत्रालयाने म्हटले आहे. आयुष नॅशलन रिसर्च सेंटरचे प्रोफेसर भूषण पटवर्धन यांनी सांगितले की, आयुष ६४ या औषधात कोरोना किंवा कोणत्याही फ्ल्यू सारख्या आजाराशी लढण्यासाठी अँन्टी इंफ्लेमेटरी आणि अँन्टी व्हायरल गुणधर्म आहेत. त्याचबरोबर केंद्रावर याच्या मानवी चाचण्या देखिल करण्यात आल्याचे सांगितले आहे.

लखनऊ येथील किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी, वर्धा येथील दत्ता मेघा इंन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि मुंबईच्या बीएमडी कोविड सेंटरमध्ये आयुष ६४ औषधावर एकूण ७० जणांवर मानवी करण्यात आली. ज्यांना आयुष ६५ औषध दिले ते रुग्णांचा रिपोर्ट सहा दिवसात निगेटिव्ह आला. तर ज्यांना हे औषध देण्यात आले नाही त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह येण्यासाठी ८ दिवस लागले. रुग्णांना दररोज दिवसातून दोन गोळ्या देण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर त्यांची RT-PCRटेस्ट निगेटिव्ह आल्यानंतरही त्यांना २ -३ आठवडे औषधे खाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

- Advertisement -

आयुष ६४ औषधाचे फायदे 

आयुष ६४ औषध ज्या रुग्णांना देण्यात आले त्यांची काळजी, थकवा, ताण तणाव कमी झाला व रुग्णांची भूक वाढली. त्याचबरोबर त्यांना शांत झोपही लागली. त्यांच्या आरोग्यावर चांगला परिणाम झाला. त्यामुळे हे औषध कोरोनाची सौम्य लक्षणे असणाऱ्यांनाही देता येऊ शकते,असे अभ्यासकांनी सांगितले आहे


हेही वाचा – coronavirus: कोरोना फक्त फुफ्फुसच नाही, तर ‘या’ अवयवांनाही करतोय निकामी

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -