भारताच्या गेमचेंजर औषधाने केलं निराश; जगाला होती आशा

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मलेरियाचं हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधाचं वर्णन गेम चेंजर म्हणून केलं होतं. मात्र हे औषध प्रभावी नसल्याचं समोर आलं आहे.

Hydroxychloroquine
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आता 'हे' लोक देखील वापरू शकतात

कोरोनाच्या उपचारात मलेरियाच्या औषधाचा वापर होत आहे. दरम्यान, आता या औषधासंदर्भात एक नवीन माहिती समोर आली आहे. कोरोना विषाणूच्या रुग्णांवर हे औषध प्रभावी ठरत असल्याचा पुरावा सापडला नसल्याचं या संशोधनात म्हटलं आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधावरील हा अभ्यास न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या औषधाचं वर्णन गेम चेंजर म्हणून केलं असून बरेच देश भारतातून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आयात करत आहेत.

कोलंबियामधील विद्यापीठात उपचार घेणाऱ्या सुमारे १,४०० रूग्णांवर अभ्यास करण्यात आला असल्याचं संशोधकांनी सांगितलं. संशोधनात असं दिसून आलं आहे की हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन कोरोना रूग्णांमध्ये मृत्यूची जोखीम कमी करत नाही अन् श्वासोच्छवासाच्या समस्या देखील कमी करत नाही. तथापि, हा अभ्यास कोणत्याही प्रयोगासाठी नव्हे तर केवळ निरीक्षणासाठी करण्यात आला आहे. काही डॉक्टरांनी असं लिहिलं आहे की हा अभ्यास अनेक महत्त्वपूर्ण सूचना देतो आणि त्यामधून कोविड -१९ रुग्णांच्या औषधांवर बरेच महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाऊ शकतात.

संपादकीयमध्ये डॉक्टरांनी लिहिलं की, “इतके दिवस होऊनही या साथीचे औषध तयार केलं गेलं नाही हे निराशाजनक आहे. औषधांवर घेतल्या गेलेल्या चाचण्यांचे परिणाम सापडत नाहीत. त्याच वेळी, हा नवीन अभ्यास हे दर्शवितो की हायड्रोक्सीक्लोरोक्विन एक रामबाण औषध नाही. याआधी या औषधामुळे हृदयाचा ठोका वाढणे आणि अचानक मृत्यू यासारखे गंभीर दुष्परिणाम सांगितले गेले होते. अमेरिकेच्या फूड अ‍ॅण्ड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशननेही कोरोना विषाणूच्या उपचारांसाठी हे औषध न वापरण्याचा इशारा दिला आहे.


हेही वाचा – कोरोनाच्या उपचारासाठी ‘गंगाजल’ वापरण्याचा केंद्र सरकारचा प्रस्ताव ICMR ने फेटाळला


या संशोधनात कोलंबियामधील डॉक्टरांना आढळले की औषध न घेतलेल्या ५६५ रुग्णांची प्रकृती अँटीबायोटिक अ‍ॅझिथ्रोमाइसिनबरोबर किंवा त्याशिवाय हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध घेत असलेल्या ८११ रुग्णांच्या तुलनेत स्थिर आहे. हे औषध घेत असलेल्या १८० रूग्णांना श्वासोच्छवासाच्या नळीची आवश्यक होती. तर २३२ लोक मरण पावले. औषधाचा रुग्णांच्या आरोग्यावर कोणताही परिणाम झाला नाही. ज्या रुग्णांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन देण्यात आले होते ते इतर रुग्णांपेक्षा आजारी होते. हे औषध त्यांना अत्यंत काळजीपूर्वक देण्यात आले होते, परंतु त्याचा त्यांना काही फायदा झाला नाही.

हे औषध रुग्णांना रूग्णालयात दाखल झाल्यानंतर दोन दिवसात देण्यात आलं. तथापि, आधीच्या अभ्यासानुसार, समीक्षकांनी असं म्हटलं आहे की जर हे औषध रुग्णांवर उशीरा वापरले गेलं तर हे औषध चांगले परिणाम दर्शविणार नाही. हा अभ्यास राष्ट्रीय आरोग्य संस्थांनी केला आहे.