घरदेश-विदेशकेरळच्या मॉलमधील अभिनेत्रीच्या विनयभंगाचा व्हिडीओ व्हायरल; होणार पोलीस चौकशी

केरळच्या मॉलमधील अभिनेत्रीच्या विनयभंगाचा व्हिडीओ व्हायरल; होणार पोलीस चौकशी

Subscribe

केरळमधील एका मॉलमध्ये प्रसिद्ध मल्याळम अभिनेत्रीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम पोस्टद्वारे या घटनेचा धक्कादायक अनुभव शेअर केला आहे. ही अभिनेत्री उत्तर केरळच्या एका जिल्ह्यातील मॉलमध्ये चित्रपटाच्या प्रमोशन कार्यक्रमासाठी गेली होती. यावेळी तिला लैंगिक शोषणाचा अनुभव आला.
या पोस्टमध्ये तिने लोकांच्या लैंगिक विषयाच्या भावनांवर राग आणि चिंता व्यक्त करत म्हटले की मंगळवारी रात्री व्यस्त मॉलमध्ये आयोजित कार्यक्रमादरम्यान आणखी एका अभिनेत्रीला असाच अनुभव आला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर होत असून तो स्थानिक टीव्ही चॅनल्सने तो प्रसारित केला आहे.

अभिनेत्रीने काल रात्री तिच्या पोस्टमध्ये लिहिले की, “कोझिकोड हे माझे खूप आवडते ठिकाण आहे. पण, आज रात्री एका कार्यक्रमानंतर परतत असताना एका व्यक्तीने मला गर्दीत पकडले. हे सांगायला मला आवडत नाही की, आजूबाजूचे लोक इतके निराश आहेत का? चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने आम्ही अनेक ठिकाणी जातो. पण इतका वाईट अनुभव मला इतर कुठेही आला नाही. माझ्या सहकारी अभिनेत्रीलाही असाच अनुभव आला. गदीच्या ठिकाणी शोषण झालेल्या इतर अभिनेत्रींनीही त्यांचे वाईट अनुभव त्यांच्या इंस्टाग्राम पेजवर शेअर केले आहेत. ती पुढे म्हणाली की, मॉलमध्ये गर्दी होती आणि सुरक्षा कर्मचारी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करत होते. यावेळी एका व्यक्तीने तिच्या सहकारी अभिनेत्यांसोबत गैरवर्तन केले परंतु ती प्रतिक्रिया देऊ शकली नाही.

- Advertisement -

अभिनेत्री पुढे म्हणाली की, ‘नंतर मलाही अशाच अनुभवाला सामोरे जावे लागले पण मी त्याला प्रत्युत्तर दिले… माझ्या आयुष्यात असा अनुभव कोणालाही येऊ नये अशी माझी इच्छा आहे…’ त्यामुळे दोषींना शिक्षा झाली पाहिजे. अशी मागणी तिने केली आहे. दुसरीकडे पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आला असून दोषींची ओळख पटवण्याचे आणि त्यांचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. महिनाभरापूर्वी याच मॉलमधील प्रमोशनल इव्हेंट त्यांच्या आवडत्या अभिनेत्याला पाहण्यासाठी जमलेली गर्दी अनियंत्रित झाल्याने तो रद्द करावा लागला होता.


धुळ्यातून नशेच्या 1000 गोळ्या, 86 गुंगीच्या औषधांच्या बाटल्यांसह तरुणाला अटक

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -