ISROच्या प्रमुख पदी S. Somanath, रॉकेट इंजिनिअरिंगचे आहेत तज्ज्ञ

Malayali scientist S Somanath appointed as ISRO chairman
ISROच्या प्रमुख पदी S. Somanath, रॉकेट इंजिनिअरिंगचे आहेत तज्ज्ञ

विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे (VSSC) संचालक आणि इस्रोचे प्रमुख वैज्ञानिक एस. सोमनाथ (S.Somanath) हे इस्रोचे नवे प्रमुख म्हणून नियुक्त झाले आहेत. तिरुवनंतपुरम स्थित असलेल्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक एस. सोमनाथ देशातील उत्तम रॉकेट टेक्नोलॉजिस्ट आणि एअरोस्पेस इंजिनिअर आहेत.

एस. सोमनाथ तिरुवनंतपुरममध्ये असलेल्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटरचे देखील संचालक राहिले आहेत. त्यांनी इस्रोच्या रॉकेट्सच्या विकासात खूप मोठे योगदान दिला आहे. सोमनाथ लाँच व्हिकलचे डिझाईनिंगमध्ये मास्टर आहेत. ते लाँच व्हिकल सिस्टम इंजिनिअरिंग, स्ट्रक्चरल डिझाइन, स्ट्रक्चरल डायनेमिक्स आणि पायरोटेक्नीक्सचे तज्ज्ञ आहेत.

इस्रोचे प्रमुख बनण्यापूर्वी ते GSAT-MK11 (F09) अपग्रेड करण्याचे काम करत होते. कारण उत्तम संचार सॅटलाईट्सला अंतराळात लाँच केले जाऊ शकेल. याशिवाय एस. सोमनाथ GSAT-6A आणि PSLV-C41 चांगले बनवण्याचे काम करत होते, कारण रिमोट सेंसिंग सॅटलाईट्सला योग्य पद्धतीने लाँच केले जावे.

एस. सोमनाथ यांनी एर्नाकुलमहून महाराज कॉलेजमध्ये प्री-डिग्री प्रोग्राम पूर्ण केले आहे. यानंतर केरळ युनिवर्सिटीच्या क्विलॉन येथे असलेल्या टीकेएम कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून मॅकेनिकल इंजिनिअरिंग केली आहे. मग त्यानंतर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्समधून एअरोस्पेस इंजिनिअरिंमध्ये मास्टर डिग्री मिळवली आहे.

ग्रॅज्युएशन केल्यानंतर त्यांनी १९८५ साली विक्रम साराभाई स्पेस सेंटर ज्वाईन केले. सुरुवातीला ते PSLV प्रोजेक्टमध्ये काम करत राहिले. त्यानंतर सोमनाथ यांना २०१०मध्ये GSLV Mk-3 रॉकेट प्रोजेक्ट संचालक बनवले गेले. २०१५ मध्ये सोमनाथ हे LPSCचे प्रमुक बनले. २०१८मध्ये VSSCचे ते संचालक झाले.


हेही वाचा – Explosion in Kabul: काबूलमध्ये तालिबानच्या सरकारी सैनिकांवर बॉम्बहल्ला, ९ जण जखमी