दिल्ली : संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे लोकसभेत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीवर भाष्य करत होते. त्यावेळी मल्लिकार्जुन भाष्य करत असताना नीरज शेखर यांनी हस्तक्षेप केला. त्यानंतर संतप्त मल्लिकार्जुन खर्गे यांनी नीरज शेखर यांना शांत बस असे सांगत तुमचे वडिल माझे सोबत असं म्हटलं. त्यावेळी दोघांमधील वाढता वाद पाहून सभापती जगदीप धनखड यांनी दोघांनाही शांत राहण्यास सांगितले. (Mallikarjun Kharge On Neeraj Shekhar Lok sabha Budget Session 2025)
नेमकं प्रकरण काय?
अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या घसरणीवर भाष्य करण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे उभे होते. मल्लिकार्जुन खर्गे यांचं भाषण सुरू असताना माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र नीरज शेखर यांनी त्यांच्या भाषणात हस्तक्षेप केला. त्यावेळी भाषणादरम्यानच खरगे यांनी निरज यांच्यावर संताप व्यक्त केला. “मी पण तुझ्या वडिलांचा असा सोबती होतो. तू कशाबद्दल बोलत आहेस? तुझ्यासोबत फिरलो आहे. चूप, चूप शांत बस”, असं म्हणत खर्गे यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर नीरज शेखर आणि मल्लिकार्जुन खर्गे यांच्यातील वाद वाढत गेला. त्यानंतर धनखड यांनी मध्यस्थी करत त्यांना शांत बसण्यास सांगितले. तसेच, चंद्रशेखर यांच्याबद्दल आम्हाला आदर आहे. त्यामुळेतुमचे विधान मागे घ्या, असे मल्लिकार्जुन खर्गे यांना सांगितले.
कोण आहे नीरज शेखर?
समाजवादी पक्षाचे माजी खासदार नीरज शेखर यांनी 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे वडील चंद्रशेखर हे देशाच्या इतिहासातील महान समाजवादी नेत्यांपैकी एक मानले जातात. ऑक्टोबर 1990 ते जून 1991 पर्यंत सहा महिने पंतप्रधान म्हणून काम केले.
हेही वाचा – CM Fadnavis on Beed Crime : असले प्रकार खपवून घेतले जाणार नाही – मुख्यमंत्री फडणवीस