Mallikarjun Kharge : काँग्रेस अध्यक्ष (Congress) मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी अध्यक्ष होण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. खर्गे यांनी एका कार्यक्रमात सांगितले की, सोनिया गांधी (Sonia Gandhi) आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी त्यांना अध्यक्ष (Congress president) केले आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षात अध्यक्ष कोणीही असो, सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे पक्षाच्या सर्वोच्च आणि निर्णायक भूमिकेत आहेत, हे खर्गे यांच्या वक्तव्याने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. परंतु मल्लिकार्जून खर्गे यांच्या या विधानानंतर आता काँग्रेस अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणार असून आता भाजपाही या मुद्द्यावर आक्रमक होऊ शकते. आज दिल्लीमध्ये अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय संमेलन कार्यक्रमात ते बोलत होते. (Mallikarjun Kharge Rahul gandhi Sonia Gandhi made me Congress president Question marks over presidential election after Kharges statement)
हेही वाचा – “मणिपूर जळत असताना, भाजप इतर राज्यांच्या प्रचारात मग्न”, मल्लिकार्जुन खर्गेंची टीका
खर्गेंनी पंतप्रधानांवर साधला निशाणा
काँग्रेसने सत्तर वर्षांत काय केलं? असा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून काही दिवसांपूर्वी उपस्थित करण्यात आला होता. या प्रश्नाना उत्तर देताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, आम्ही लोकशाही आणि संविधान वाचवले, म्हणून तुम्ही पंतप्रधान होऊ शकला, असा टोला लगावतानाच त्यांनी मोदींनी स्वातंत्रदिनी केलेल्या भाषणावर निशाणा साधला. खर्गे म्हणाले की, 15 ऑगस्टला मोदी म्हणाले होते की, ते 2024 मध्ये लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवतील. मला वाटतं ते तिरंगा नक्कीच फडकवतील, पण लाल किल्ल्यावर नाही तर त्याच्या घरून.
लाइव: अखिल भारतीय महिला कांग्रेस के राष्ट्रीय सम्मेलन – “प्रतिज्ञा- उज्ज्वल भारत की”
📍तालकटोरा स्टेडियम, नई दिल्ली https://t.co/TLGNPGi26O
— Mallikarjun Kharge (@kharge) August 17, 2023
हेही वाचा – ‘या’ राज्यातील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन नेत्यांनी केल्या मोफत योजनांच्या खैरातीची घोषणा; वाचा सविस्तर
काँग्रेस पक्षातील बड्या नेत्यांनी देशासाठी प्राण दिले
भाजपाच्या नेतृत्वावर आणि नेत्यांवर प्रश्न उपस्थित करताना खर्गे म्हणाले की, इंदिरा आणि राजीव गांधी यांनी देशाला एकसंध ठेवण्यासाठी बलिदान दिले. काँग्रेस पक्षातील मोठ्या नेत्यांनी देशासाठी प्राण दिले, पण भाजपाकडे असा कोणाता नेता आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ते म्हणाले की, आम्ही या देशासाठी आमचे योगदान देत आहोत, कारण राजकारण ही सेवा आहे. महात्मा गांधींना काय मिळाले? असा प्रश्न उपस्थित करताना खर्गे म्हणाले की, ते या देशाचे पंतप्रधान होऊ शकले नाही राष्ट्रपती. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केले. त्यामुळे भारताला स्वातंत्र मिळाले, असे खर्गे म्हणाले.