मल्लिकार्जुन खर्गेंनी सोडलं विरोधी पक्षनेतेपद, सोनिया गांधींकडे सुपूर्द केला राजीनामा

three big spokespersons of congress resigned presidential cadidate kharge will campaign

काँग्रेस अध्यक्षपदाचे उमेदवार मल्लिकार्जुन खर्गे यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपदीचा राजीनामा दिला आहे. हा राजीनामा त्यांनी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे सुपूर्द केला आहे. काल खर्गेंनी अध्यत्रक्षपदाचा अर्ज दाखल केला. यावेळी मल्लिकार्जुन खर्गेंसोबत पक्षाचे वरिष्ठ नेते मोठ्या प्रमाणावर अर्ज दाखल करण्यासाठी गेले होते. तिथेही त्यांनी शक्तीप्रदर्शन केलं. परंतु माझ्यासोबत सामान्य कार्यकर्ते होते आणि काँग्रेस नेतृत्त्वानं खर्गे यांना अधिकृत उमेदवार का म्हणून दाखवलं जातंय, असा सवाल खासदार शशी थरुर यांनी उपस्थित केला होता. मात्र, अर्ज दाखल केल्यानंतर खर्गे आणि थरूर यांच्यात थेट लढत होणार आहे.

काँग्रेसमध्ये ‘एक व्यक्ती एक पद’ या तत्त्वानुसार खर्गे यांनी हा राजीनामा दिल्याचं सांगण्यात येतं आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत खर्गे हे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. अध्यक्षपदासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांच्याशिवाय शशी थरूर, के. एन. त्रिपाठी यांनीही अर्ज दाखल केले आहेत.

80 वर्षीय मल्लिकार्जुन खर्गेंनी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांसह उमेदवारी अर्जांचे 14 संच सादर केले. त्यांच्या समर्थनाथ अशोक गेहलोत, दिग्विजय सिंग, एके अँटनी, अंबिका सोनी, मुकुल वासनिक यांचा समावेश आहे. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी 17 ऑक्टोबरला मतदान होणार आहे आणि 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाणार आहे.


हेही वाचा : खर्गेंना अधिकृत उमेदवार म्हणून का दाखवलं जातंय?, शक्तीप्रदर्शनानंतर शशी थरुर यांचा सवाल