Friday, April 16, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश सावध व्हा, आपल्याच लोकांना मारून राज्यात दंगल घडवणं, हाच भाजपचा प्लान- ममता...

सावध व्हा, आपल्याच लोकांना मारून राज्यात दंगल घडवणं, हाच भाजपचा प्लान- ममता बॅनर्जी

Related Story

- Advertisement -

चार राज्यांसह एका केंद्र शासित प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचार मोहीम, प्रचार सभा सुरू आहेत. यादरम्यान, अनेक नेत्यांचे वक्तव्य, एकमेकांवरील कुरघोड्या सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी असा आरोप केला की, भाजपाची सत्ता असलेल्या राज्यातील पोलिसांचं पथक नंदीग्राम विधानसभा मतदार संघातील मतदारांना भयभीत करत आहेत. या मतदार संघात ममता बॅनर्जी यांच्या विरूद्ध माजी सहकारी शुभेंदु अधिकारी भाजपाचे उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.

भंगाबेरा येथून रोड शो सुरू करण्यापूर्वी बॅनर्जी यांनी सोनाचूरा येथील जाहीर सभेत सांगितले की, गावातील मतदारांना धमकावण्यासाठी तसेच भयभीत करण्यासाठी आणि भाजपच्या बाजूने वातावरण निर्माण करण्यासाठी मध्य प्रदेशातील पोलिसांना तैनात करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांनी असेही म्हटले की, त्यांना नंदीग्राम विधानसभा मतदार संघातून आपला विजय होणार आणि सलग तिसऱ्यांदा त्यांचा पक्ष सत्तेत येणार यासंदर्भात ममता बॅनर्जींना विश्वास आहे. तसेच, शुभेंदु अधिकारी यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे, यावेळी ते म्हणाले, ‘नंदीग्राम विधानसभा मतदार संघात तैनात केलेले पोलीस कर्मचारी काही दिवसच राहणार आहे. कोणतीही चूक करू नका, आम्ही पुन्हा येणार आणि या गद्दारांना कठोर उत्तर देऊ. आपल्याच लोकांना मारून राज्यात दंगल घडवणं, हाच भाजपचा प्लान’, असल्याचेही म्हणत त्यांनी भाजपावर टीकास्त्र सोडले आहे.

- Advertisement -

नंदीग्राममध्ये १ एप्रिल रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी “जातीय दंगली घडविण्याचा कोणताही प्रयत्न” करण्यापासून सावध राहण्याचे आवाहन बॅनर्जी यांनी केले. भगवा पक्षाचे नाव न घेता ते म्हणाले की, “सावध व्हा, आपल्याच लोकांना मारून राज्यात दंगल घडवणं, हाच भाजपचा प्लान आहे.”


- Advertisement -