घरदेश-विदेशनेताजींच्या पुतळा अनावरण समारंभाच्या निमंत्रणावरून ममता बॅनर्जी झाल्या संतप्त

नेताजींच्या पुतळा अनावरण समारंभाच्या निमंत्रणावरून ममता बॅनर्जी झाल्या संतप्त

Subscribe

नवी दिल्ली – पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज दिल्लीतील नेताजींच्या पुतळ्याच्या उद्घाटनासंदर्भातील कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले, कारण निमंत्रण देण्याची पद्धत योग्य नव्हती. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, त्यांना बुधवारी एका नोकरशहाकडून पत्र मिळाले होते, ज्यामध्ये आज संध्याकाळच्या कार्यक्रमाची माहिती दिली होती.

ममता यांनी कोलकाता येथील एका रॅलीत सांगितले की, मला बुधवारी अवर सेक्रेटरींकडून एक पत्र मिळाले होते, ज्यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते सायंकाळी ७ वाजता नेताजींच्या पुतळ्याचे उद्घाटन होईल आणि तुम्ही संध्याकाळी ६ वाजता तेथे या असे म्हटले होते. जैसे मैं उनकी नौकर हूं…. असे म्हणत अवर सचिव मुख्यमंत्र्यांना असे कसे पत्र लिहू शकतात? संस्कृती मंत्री इतके मोठे कसे होतात?, असा प्रश्न त्यांनी विचारला.

- Advertisement -

दुपारीच वाहिली अदरांजली –

पुढे त्यामुळेच आज दुपारी मी नेताजींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली, असे ममता बॅनर्जी म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी इंडिया गेटजवळ नेताजींच्या पुतळ्याचे आणि सेंट्रल व्हिस्टाचे उद्घाटन करणार आहेत.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -