घरदेश-विदेशबेटांची नावे बदलल्यानंतर ममता बॅनर्जी मोदींवर कडाडल्या, राजकीय फायद्यासाठी...

बेटांची नावे बदलल्यानंतर ममता बॅनर्जी मोदींवर कडाडल्या, राजकीय फायद्यासाठी…

Subscribe

Mamata Banerjee | नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी १८४३ साली द्वीपसमुहाचा दौरा केला होता, त्यानंतर त्यांनी या बेटांचे नाव शाहिद आणि स्वराज असं ठेवलं होतं. मात्र, मोदींनी या बेटांची नावे बदलली आहेत.

कोलकाता – नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त अंदमान आणि निकोबारमधील २१ मोठ्या बेटांचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नामकरण करण्यात आले. यावरून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे. मोदींनी राजकीय फायद्यासाठी या बेटांचं नामकरण केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी १८४३ साली द्वीपसमुहाचा दौरा केला होता, त्यानंतर त्यांनी या बेटांचे नाव शाहिद आणि स्वराज असं ठेवलं होतं. मात्र, मोदींनी या बेटांची नावे बदलली आहेत.

हेही वाचा परमवीर चक्रविजेत्यांच्या नावाने ओळखले जातील ‘या’ 21 बेटांची नावं

- Advertisement -

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीच वेळापूर्वी या बेटांचं नामकरण केलं आहे. परमवीर चक्र विजेत्यांची नावे या बेटांना देण्यात आली आहे. त्यानंतर, लागलीच ममता बॅनर्जी यांनी मोदींवर हल्लाबोल केला. काही लोक लोकप्रियता मिळवण्याकरता अंदमान द्वीपांचं नाव शाहिद आणि स्वराज ठेवण्याचा दावा करत आहेत. पण तेथील सेलुलर तुरुगांचं निरिक्षण करण्याकरता जेव्हा सुभाषचंद्र बोस तेथे गेले होते तेव्हाच त्यांनी ही नावे ठेवली होती.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमध्ये एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अनेक प्रतिष्ठित व्यक्ती आणि सुभाषचंद्र बोस यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत रेड रोड कार्यक्रमात सुभाषचंद्र बोस यांना श्रद्धांजली अर्पण केली.

- Advertisement -

हेही वाचा – सोशल मीडियावरील खोट्या जाहिरातींवर केंद्राची नजर, इन्फ्लूएन्सर्ससाठी नियमावली जारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -