घरदेश-विदेशभाजपा सर्वत्र सरकार पाडण्यात मग्न, ममता बॅनर्जींची टीका

भाजपा सर्वत्र सरकार पाडण्यात मग्न, ममता बॅनर्जींची टीका

Subscribe

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज कोलकाता येथे शहीद दिनानिमित्त आयोजित सभेत भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भाजप सर्वत्र सरकार पाडण्यात व्यस्त असल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. ते त्याचं काम आहे. महागाई आणि जीएसटीच्या मुद्द्यावरही ममता यांनी केंद्रावर ताशेरे ओढले.

हजारो लोकांच्या सभेला संबोधित करताना, भाजपचे नाव न घेता, ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पश्चिम बंगालमध्ये त्यांनी आम्हाला पराभूत करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना यश आले नाही. इथे पाऊस पडतोय आणि रस्ते जलमय झालेत पण आमचे समर्थक इथून हलले नाहीत.

- Advertisement -

नरेंद्र मोदी सरकारवर निशाणा साधत ते म्हणाले की, ते सर्व राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असून 2024 च्या निवडणुकीत जनता या सरकारला केंद्रातील सत्तेतून बाहेर फेकून देईल. बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसच्या रॅलीमध्ये रवींद्रनाथ टागोर यांचा उल्लेख केला होता, ‘जेथे मन निर्भय असते, तेथे डोके अभिमानाने उंच असते’. ते म्हणाले की, काही लोकांना आमच्या भरती प्रक्रियेत त्रुटी दिसतात. मात्र, रेल्वे, केंद्र सरकारच्या खात्यांमध्ये होत असलेल्या भरतीबाबत काहीच का सांगितले जात नाही. त्या म्हणाल्या की, आज रुपया सर्वात कमी आहे आणि केंद्राने आता मुरमुऱ्यावरही जीएसटी लावला आहे, त्यामुळे आता भाजपचे लोक ते खाणार नाहीत. मिठाई, लस्सी आणि दही यावर जीएसटी लावला. त्याना विचारले लोक काय खातील? रुग्णाला रुग्णालयात दाखल करून घेण्यासाठीही जीएसटी आकारला जातो आहे.

बंगालमधील सत्ताधारी टीएमसी दरवर्षी 21 जुलै रोजी शहीद दिन रॅलीचे आयोजन करते. आजच्या रॅलीत पक्षाचे हजारो समर्थक उपस्थित होते. रॅलीमध्ये स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या किमती आणि महागाईवरून केंद्रावर जोरदार निशाणा साधण्यात आला.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -