घरताज्या घडामोडीबीएसएफ आणि त्रिपुरा दंगलीबाबत ममता बॅनर्जी यांनी घेतली पीएम मोदींची भेट

बीएसएफ आणि त्रिपुरा दंगलीबाबत ममता बॅनर्जी यांनी घेतली पीएम मोदींची भेट

Subscribe

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पीएम नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली आहे. या दोघांमध्ये जवळपास ३० मिनिटांपर्यंत चर्चा झाली. ज्यामध्ये ममता बॅनर्जी यांनी सीमा सुरक्षा दल आणि त्रिपुरातील दंगलीबाबत चर्चा केली. ममता बॅनर्जी सोमवारी दिल्लीला पोहचल्या होत्या.

ममता बॅनर्जी यांनी सांगितलं की, जर बीएसएफ जास्त अधिकार मिळाले तर त्याचा राज्याच्या व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. कायदा आणि सुव्यवस्था हा राज्याचा विषय आहे. कारण बिहारमध्ये बीएसएफच्या जवानांनी अंधाधुंध फायरिंग केली होती. बीएसएफ संबंधीशी घटना या उत्तर दिनाजपूर आणि बंगालच्या सीमेवर्ती घडलेल्या आहेत. त्यामुळे त्यांनी याविषयावर चर्चा करत अनेक मुद्दे उपस्थित केल्याचं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

ममता बॅनर्जी यांनी आज पीएम नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दरम्यान, ममता बॅनर्जी यांनी त्रिपुरातील कथित दंगलीबाबत मुद्दा उपस्थित केला आहे. माझी कार्यकर्ता शायनी घोष यांच्यावर निशाणा साधत त्यांना अटक करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ममता बॅनर्जी यांनी पीएम मोदींना पश्चिम बंगालमध्ये २० आणि २१ एप्रिल २०२२ मध्ये होणाऱ्या बिझनेस मीटच्या संबधीत मोदींना आमंत्रण दिल्याचं सांगितलं जात आहे.

- Advertisement -

ममता बॅनर्जी घेणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये रणशिंग फुकण्याची तयारी प. बंगलाच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सुरु केली आहे. यासाठी सर्व विरोधकांची एकत्र मोट बांधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ३० नोव्हेंबरला ममता बॅनर्जी या मुंबईला येणार आहेत. या मुंबई दौऱ्यात त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -