Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी Mamata Banerjee : दीदींनी पीएम मोदींना पाठवले खास आंबे, दोन जण ठरले लाभार्थी?

Mamata Banerjee : दीदींनी पीएम मोदींना पाठवले खास आंबे, दोन जण ठरले लाभार्थी?

Subscribe

क्रिकेट, राजकारण आणि सिनेमा या तीन गोष्टींमध्ये सर्वसामान्यांना मोठा रस असतो. परंतु या तीन गोष्टींच्या पलीकडे देखील एखादी विशिष्ट गोष्ट करण्यासाठी अनेक व्यक्तीमत्व आहेत. राजकारणात कितीही टीका आणि आरोप-प्रत्यारोप होत असले तरीही एकमेकांबद्दल हा आदर असतोच. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना खास आंबे पाठवले आहेत. बॅनर्जी मोदींचे राजकीय विरोधक असल्या तरीदेखील त्यांनी आंबे पाठवले आहेत. मागील १२ वर्षांपासून बॅनर्जी पंतप्रधान कार्यालयामध्ये राज्यातील सर्वोत्तम प्रजातीचे आंबे पाठवत आहेत. यामध्ये दोन जण लाभार्थी ठरल्याचे सांगितले जात आहे.

दोन जण ठरले लाभार्थी?

हिमसागर, फाजली, लंगडा आणि लक्ष्मण भाग या प्रजातींचे प्रत्येकी ४ किलो आंबे ममता बॅनर्जी यांनी पीएम मोदींना पाठवले आहेत. हे आंबे पंतप्रधान निवास ७, लोक कल्याण मार्ग, नवी दिल्ली या पत्यावर पाठवण्यात आल्याचं एका इंग्रजी वृत्तपत्राने म्हटलं आहे. आंब्याच्या पेट्या आज किंवा उद्यापर्यंत दिल्लीमध्ये पोहोचतील. त्याचप्रमाणे पंतप्रधान मोदींशिवाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि भारताचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनाही आंबे पाठवण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

मागील वर्षी ममता बॅनर्जींनी काँग्रेसच्या नेत्या आणि माजी पक्षाध्यक्ष सोनिया गांधींना आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनाही आंबे पाठवले होते. राजकीय मतभेद असले तरी ते खासगी आयुष्यात एकमेकांना अनेकदा भेटवस्तू पाठवत असतात.

२०१९मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच दुर्गा पूजेच्यानिमित्ताने दरवर्षी तृणमूलच्या सर्वेसर्वा असलेल्या ममता बॅनर्जी आपल्याला कुर्ता-पायजमा आणि मिठाई पाठवतात असं सांगितलं होतं. यापूर्वी २०२१ मध्ये शेख हसीना यांनी मोदी आणि ममता बॅनर्जी यांना भेट म्हणून २६०० किलो आंबे पाठवले होते. बांगलादेशी ट्रकमधून आलेल्या या मालामध्ये प्रसिद्ध हरिभंगा आंब्याच्या २६० पेट्या होत्या.


- Advertisement -

हेही वाचा : Wrestlers Protest : क्रीडामंत्र्यांच्या चर्चेनंतर कुस्तीपटूंवरील गुन्हे मागे, WFIच्या निवडणुका कधी?


 

- Advertisment -