घरदेश-विदेशपंतप्रधान मोदी, अमित शाह देशातील सिंडिकेट, ममता बॅनर्जींचे मोदींना प्रत्युत्तर

पंतप्रधान मोदी, अमित शाह देशातील सिंडिकेट, ममता बॅनर्जींचे मोदींना प्रत्युत्तर

Subscribe

ममतांचे जनतेला आवाहन

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये वर्चस्व मिळवण्यासाठी भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे. पश्चिम बंगालमध्ये सध्या निवडणुकीच्या पार्श्वभीवर प्रचार, सभा आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. भाजप बंगालमध्ये परिवर्तन नाहीतर दिल्लीमध्ये करणार आहे. मोदींनी म्हटलंय बंगालमध्ये महिला सुरक्षित नाहीत परंतु जर त्यांनी उत्तरप्रदेश, बिहार आणि इतर राज्यापेक्षा बंगालमध्ये महिला सुरक्षित आहेत. मी वन-ऑन-वन खेळण्यासाठी सज्ज आहे. जर भाजपला मत खरेदी करायची असतील तर त्यांच्याकडून पैसे घ्या आणि तृणमूल काँग्रेसला मतदान करा असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी जनतेला केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सभेत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांच्यावर आरोप केले होते. ममता दीदींनी जनतेचा विश्वास घात केला असल्याचा आरोप मोदींनी केले होता. तसेच ममती दीदींचे सरकार भ्रष्ट आहे त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये परिवर्तन करण्यासाठी आलो असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले होते.

पश्चिम बंगालमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजपने आपली कंबर कसली आहे. तर ममता बॅनर्जी यांनीही आपला गड राखण्यासाठी जय्यत तयारी सुरु केली आहे. ममता बॅनर्जी यांच्यावर केलेल्या आरोपांवर मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. ममता बॅनर्जी यांनी एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीविरोधात सिलिगुडीमध्ये पदयात्रा काढून आंदोलन केले. यावेळी ममता बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर चांगलाच पलटवार केला आहे. मोदी बंगालमध्ये परिवर्तन नाहीतर दिल्लीत करत आहेत. तसेच मोदींनी पश्चिम बंगालमध्ये महिला सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे. परंतु पश्चिम बंगालमधील महिला सुरक्षित असून उत्तर प्रदेश, बिहार आणि इतर राज्यात महिला सुरक्षित नसल्याचे म्हटले आहे.

- Advertisement -

ममतांचे जनतेला आवाहन

भाजपला जर मत खरेदी करायची असतील तर त्यांच्याकडून पैसे घ्या आणि तृणमूलला काँग्रेसला मत द्या असे आवाहन ममता बॅनर्जी यांनी जनतेला केले आहे. तसेच सरकार देशातील सर्वच विकत सुटले आहे. मोदी सरकारने दिल्ली विकली, डिफेन्स, एअर इंडियाही विकले तसेच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नावावरील स्टिडियमही त्यांनी आपल्या नावावर करुन घेतले आहे. कोरोना काळात मी राज्यात फिरत होते त्यावेळी मोदी कुठे होते असा प्रश्नही ममता बॅनर्जी यांनी उपस्थित केला आहे. ममता बॅनर्जींनी देशाचे गृहमंत्री अमित शाह यांच्यावरही निशाणा साधत सिंडिकेट असल्याचे म्हटले आहे. तसेच उज्ज्वला गॅस योजनेत घोटाळा झाला असल्याचे कॅगने म्हटले असल्याचेही खुलासा ममता बॅनर्जी यांनी केला आहे.


हेही वाचा : ममता दीदींनी बंगालचा विश्वासघात केला, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

- Advertisement -

 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -