घरदेश-विदेशदेवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्यानंतर ममता दीदी देणार टक्कर

देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरे यांच्यानंतर ममता दीदी देणार टक्कर

Subscribe

गोवा विधानसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा तृणमूल काँग्रेसने केली आहे. दरम्यान, गोव्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेस नेते लुईजिन्हो फलेरो यांनी पक्षाचा राजीनामा दिला असून ते तृणमूलमध्ये जाण्याची शक्यता आहे. जर फलेरो तृणमुलमध्ये गेले तर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या समोर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह ममता बॅनर्जींचं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. फडणवीस यांच्याकडे गोव्याची जबाबदारी देण्यात आली आहे, तर शिवसेनेनं देखील निवडणूक लढवण्याची घोषणा केली.

लुईजिन्हो फलेरो यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वाचं कौतुक केलं आहे. फलेरो यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे वर्णन ‘स्ट्रीट फाइटर’ असे केले होते. ममता बॅनर्जी फुटीरतावादी शक्तींशी एकट्या लढत आहेत, असं लुईजिन्हो फलेरो म्हणाले होते. २०१९ मध्ये त्रिपुराचे काँग्रेस प्रभारी असलेले फलेरो टीएमसीला फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. त्रिपुरामध्ये टीएमसीसाठी त्यांना मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवलं जाऊ शकतं, अशी सूत्रांची माहिती आहे.

- Advertisement -

तृणमूल काँग्रेस गोवा विधानसभा निवडणूक लढवणार

तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन यांनी त्यांचा पक्ष गोव्यातील विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार तसंच मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करेल, असं म्हणाले होते. गोव्यातील सत्ताधारी भाजप आमचा मोठा प्रतिस्पर्धी आहे, असं डेरेक ओब्रायन म्हणाले होते. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील पक्षात “हाय कमांड संस्कृती” नाही, असं देखील त्यांनी स्पष्ट केलं होतं. गोव्यात टीएमसी स्थानिक नेत्यांना उभं करेल, असं डेरेक ओब्रायन यांनी सांगितलं होतं.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -