Wednesday, May 5, 2021
27 C
Mumbai
घर देश-विदेश ममता बॅनर्जी ५ मे रोजी घेणार तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

ममता बॅनर्जी ५ मे रोजी घेणार तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ

Related Story

- Advertisement -

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेस लवकरच सरकार स्थापन करणार असून याबाबत तृणमूल काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत विधिमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून निवडल्या गेल्या असून येत्या ५ मे रोजी ममता बॅनर्जी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. तर उर्वरित आमदारांचा शपथविधी ६ मे रोजी होणार आहे. यासंदर्भातली माहिती तृणमूलचे जेष्ठ नेते पार्था चॅटर्जी यांनी दिली.

५ मे रोजी होणारा शपथविधी सोहळा साध्या पद्धतीने केला जाणार आहे. कोरोनाच्या लढाईत देश जिंकल्यानंतर आम्ही उत्सव साजरा करणार, असं ममता बॅनर्जी यांनी सांगितलं. आज तृणमूल काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत ममता ब२नर्जी यांना विधीमंडळ पक्षाच्या नेत्या म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

- Advertisement -

ममता यांनी पत्रकार परिषदेत भाजप पक्ष कार्यालयावरील हल्ल्यावर देखील प्रतिक्रिया दिली. मला हिंसाचार पसंत नाही. ते लोक जुने फोटो दाखवत आहेत. परंतु भाजप असं का करीत आहे हे कळायला मार्ग नाही. भाजपने केंद्रीय बलाचा वापर करत आम्हाला त्रास देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. पण मी बंगालमधील सर्व नागिरकांना शांततेचं आवाहन करते, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या.

- Advertisement -

भाजप सम्राट नाही. आम्ही २४ तास काम करतो आणि आपल्या लोकांशी संपर्कात असतो. बंगालमध्ये आम्ही विनाशाचा मार्ग रोखला आहे. बंगालच्या जनतेनं हे थांबवलं आहे. आपल्या विजयाचे श्रेय ममतांनी तरुणांना आणि महिलांना दिलं आहे. नंदीग्राममधील मतमोजणीच्या संदर्भात ममता म्हणाल्या की पक्ष त्याबाबत विचार करीत आहे.

 

- Advertisement -