ममता बॅनर्जींचा काँग्रेसला झटका, गैर भाजप मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला नाही दिले निमंत्रण

बंगालमध्ये काँग्रेस आणि डावे हे तृणमूलचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत, ज्यामुळे राष्ट्रीय स्तरावर सहकार्य करण्याच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण झाला असल्याचे ममाता बॅनर्जी यांनी सांगितले.

Mamata Banerjee's blow to Congress non-BJP chief minister's meeting was not invited
ममता बॅनर्जींचा काँग्रेसला झटका, गैर भाजप मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला नाही दिले निमंत्रण

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला एका बाजूला करण्याचा प्लान केला आहे. दिग्गज प्रादेशिक पक्षांचे प्रमुख एमके स्टॅलिन आणि के चंद्रशेखर राव यांच्याशी संपर्क साधला आहे. तसेच हा काँग्रेसला मोठा धक्का मानला जात आहे. कोणत्याही प्रादेशिक राजकीय पक्षाचे देशातील सर्वात जुन्या पक्षाशी चांगले संबंध नाहीत पण तो आपल्या मार्गाने पुढे जाऊ शकतो. असे ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

पंजाबच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी तामिळनाडू आणि तेलंगणामधील तिच्या समकक्षांशी संपर्क साधला आणि देशाच्या फेडरल रचनेचे “संरक्षण” करण्यासाठी विरोधी मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत चर्चा केली. या बैठकीसाठी काँग्रेसला निमंत्रित करण्यात आले नाही असे ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केले आहे. ममता बॅनर्जी यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्या म्हणाल्या की, “कोणत्याही प्रादेशिक पक्षाचे काँग्रेससोबत चांगले संबंध नाहीत. काँग्रेस पक्ष स्वत:च्या मार्गाने जाईल, आम्ही आमच्या मार्गाने जाऊ.”

ममता बॅनर्जी म्हणाल्या की, काँग्रेस आणि डाव्यांना भाजपच्या विरोधात इतर विरोधी पक्षांसह एकत्र येण्यास सांगितले होते, परंतु त्यांनी ऐकले नाही. बंगालमध्ये काँग्रेस आणि डावे हे तृणमूलचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत, ज्यामुळे राष्ट्रीय स्तरावर सहकार्य करण्याच्या प्रयत्नांना अडथळा निर्माण झाला असल्याचे ममाता बॅनर्जी यांनी सांगितले.

तामिळनाडुचे मुख्यमंत्री स्टॅलिन आणि तेलंगानाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांना आपल्या फोन कॉल्सबाबत माहिती देताना सांगितले की, देशाच्या संविधानाला नष्ट करण्यात येत आहे. त्याचे रक्षण करण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. काँग्रेस तामिळनाडूमध्ये स्टॅलिनच्या पक्ष डीएमकेचा मित्रपक्ष आहे. तृणमूलचा काँग्रेससोबतचा युतीचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात पोहोचला नसताना आणि दोन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू केल्याने गोव्याच्या निवडणुकीत त्यांच्या वाटचालीनंतर बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे काँग्रेससोबतचे शीतयुद्ध अधिक तीव्र झाले.


हेही वाचा : Punjab Elections 2022: सत्तेत आल्यावर एक लाख नोकऱ्यांचे पंजाबच्या मुख्यमंत्र्यांचं आश्वासन