घरताज्या घडामोडीममतांचे वक्तव्य खोटं, मोदींसोबतच्या बैठकीला ठरवून विलंब केल्याचा राज्यपालांचा आरोप

ममतांचे वक्तव्य खोटं, मोदींसोबतच्या बैठकीला ठरवून विलंब केल्याचा राज्यपालांचा आरोप

Subscribe

बैठकीस ममता बॅनर्जी आणि मुख्य सचिव यांनी तब्बल आर्धा तास उशीर केला

पश्चिम बंगालच्या राजकारणात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या आहेत. यामध्ये आता पुन्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी विरुद्ध राज्यपाल जगदीप धनखड असा आरोपांच्या सिलसीला सुरु झाला आहे. यास चक्रिवादळाच्या तडाख्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर होते यावेळी मोदींनी पश्चिम बंगालमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली होती. परंतु पश्चिम बंगालच्या मिदनापुर येथे मोदींनी आढावा बैठक घेतली होती या बैठकीस ममता बॅनर्जी आणि मुख्य सचिव यांनी तब्बल आर्धा तास उशीर केला होता. याबाबत ममतांनी मोदींना पत्र लिहून सफाई दिली होती परंतु ममता बॅनर्जींनी केलेंल वक्तव्य खोट असून त्यांनी मोदींच्या बैठकीला ठरवून विलंब केला आहे. त्याबाबत ममतांनी अगोदरच इशारा दिला होता असे पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी सांगितले आहे.

पश्चिम बंगालचे राजकारणात सतात केंद्र सरकार किंवा ममता अन्यथा ममता विरुद्ध राज्यपाल या चक्रात सुरु असते. आता ममता बॅनर्जी विरोधात राज्यपाल जगदीप धनखड यांच्यातील वाद पुन्हा पेटला आहे. ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत बैठकीस उशीरा आणि लवकर निघण्याबाबत दिलेले कारण असत्य असल्याचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी ट्विट करत म्हटले आहे. राज्यपाल जगदीप धनखड यांनी मंगळवारी ट्विट करत माहिती दिली आहे.

- Advertisement -

पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी ट्विट करत म्हटलंय की, खोटी कारण एकल्यानंतर आता खरे कारण सांगत आहे. २७ मे रात्री ११.१५ वाजता ममता बॅनर्जी यांनी मला मेसेज केला की मी आता महत्त्वाचे बोलू शकते का? यावेळी फोनवर बोलताना ममतांनी संकेत दिले की, ममता आणि त्यांचे अधिकारी मोदींच्या बैठकीस विलंब अन्यथा बहिष्कार करु शकतात. जर विरोधी पक्षनेते शुभेंदु अधिकारी यांना या बैठकीला बोलावले तर, अशा प्रकारे अहंकाराला सार्वजनिक सेवेपेक्षा अधिक प्राधान्य देण्यात आले आहे. अशा आशयाचे ट्विट राज्यपाल जगदीप धनखड यांनी केले आहे.

- Advertisement -

यास चक्रीवादळानंतर मागील आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी ओडीशा आणि पश्चिम बंगाल दौऱ्यावर होते. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हवाई पाहणी केली यानंतर त्यांनी बंगालच्या कलाईकुंडा येथे बैठक आयोजित केली होती. या बैठकीला ममता बॅनर्जी आणि मुख्य सचिव ३० मिनीट उशीरा पोहोचले होते. एवढेच नाही तर ममता बॅनर्जी काही वेळ थांबल्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना नुकासानीची पाहणी केली आणि तेथून निघाल्या यामुळे पंतप्रधान मोदींचा अवमान झाला असल्याची चर्चा सुरु होती.

ममतांचे मोदींना पत्र

ममता बॅनर्जी आणि मुख्य सचिवांच्या वागणुकीनंतर केंद्र सरकारने मुख्य सचिवांना दिल्लीत रिपोर्ट करण्याचे आदेश दिले होते. परंतु ममता बॅनर्जी यांनी पत्रव्यवहार करुन मुख्य सचिवांना पाठवणार नाही असे सांगितले. या पत्रात भेटीच्या दरम्यान झालेल्या गोष्टींचा काही संबंध आहे का? असा सवाल करत त्यावर म्हणाल्या की, मी स्वतः आढावा बैठकीत चर्चा करु इच्छित होते. परंतु बैठकीमध्ये बदलाव करुन आपल्या पक्षातील विरोधी पक्षनेत्यांना आमंत्रित केले. कारण माझ्या माहितीनुसार पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत विरोधी पक्षनेत्याचे काहीही काम नाही. तसेच तुम्ही गवर्नर आणि केद्रीय मंत्र्यांना आमंत्रित केले होतं यावर कोणतेही कारण आमच्याकडून देण्यात आले नव्हते. यासर्व कारणांमुळे मुख्य सचिवांना बोलावण्यात येत असेल तर ते आम्हाला कदापी मान्य नाही असे ममता बॅनर्जी यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे. ममतांनी पंतप्रधान मोदींना एकुण ५ पानांचे पत्र लिहिले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -