घरदेश-विदेशमी एका पायावर बंगाल तर दोन्ही पायांवर दिल्ली जिंकेन!

मी एका पायावर बंगाल तर दोन्ही पायांवर दिल्ली जिंकेन!

Subscribe

ममता बॅनर्जींचा भाजपवर निशाणा

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पाश्वर्र्भूमीवर राजकीय वातावरण तापलेले आहे. एकूण आठ टप्प्यांत मतदान प्रक्रिया पार पडणार असून, आतापर्यंत दोन टप्प्यातील मतदान पार पडलेले आहे. तर, मंगळवार ६ एप्रिल रोजी तिसर्‍या टप्प्यामधील मतदान होणार आहे. आतापर्यंत ६० जागांसाठी मतदान झालेले आहे. तर, तिसर्‍या टप्प्यात ३१ जागांसाठी मतदान होणार आहे. या दरम्यान भाजप व टीएमसीकडून जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. मी एका पायावर बंगाल जिंकेन आणि भविष्यात दोन्ही पायांवर दिल्लीवर विजय मिळवेन, असे ममता बॅनर्जींनी म्हटले आहे. हुगळीतील देवबंदपूर येथील एका रॅलीत बोलताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या, भाजपवाल्यांनो तुम्ही पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढवण्यासाठी स्थानिक उमेदवार शोधू शकत नाही? त्यांच्याकडे आपला कोणताही स्थानिक उमेदवार नाही.

- Advertisement -

निवडणूक लढवण्यासाठी टीएमसीकडून किंवा सीपीएमकडून लोक उधार घेतली आहेत. ती लोक पाण्यासारखा पैसा सोडत आहेत. जी लोक नीट सोनार बंगला बोलू शकत नाहीत, ते बंगालवर काय राज्य करणार? मी आज एका पायावर बंगाल जिंकेन आणि उद्या दोन्ही पायांवर दिल्लीवर विजय मिळवेन. गेल्याच आठवड्यात ममता यांनी विरोधी पक्षांच्या सर्व नेत्यांना पत्र लिहून एकत्र येण्यासाठी आवाहन केले होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -